शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या शत्रूशी व्यवहार करण्याचे कारण काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 22:04 IST

Nagpur News मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? अशा मंत्र्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजीनामा घ्यायला हवा, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठळक मुद्देनवाब मलिकांचा राजीनामा घेतलाच पाहिजे

नागपूर : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे रिअल इस्टेटचे व्यवहार मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून कसे होत होते हे समोर आले आहे. मुळात जे लोक मुंबईत बॉम्बस्फोट करतात, अशांना या व्यवहारातून पैसे दिले जात असतील, तर अशी बाब अतिशय गंभीर आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत महाराष्ट्रातील मंत्र्याने व्यवहार करण्याचे कारण काय? अशा मंत्र्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजीनामा घ्यायला हवा, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएच्या ऑपरेशन्समध्ये एक मोठी लिंक मिळाली, ज्यातून रियल इस्टेटचे व्यवहार हे मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून होत आहेत, हे लक्षात आले. ८ ठिकाणी सर्च केल्यानंतर काही बाबी पुढे आल्या. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डच्या माणसांकडून जमीन घेतली. कोट्यवधीच्या रकमेच्या या सौद्यातील ५५ लाख रुपये हे हसिना पारकरला मिळाले. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता, अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट ईडीच्या कारवाईचे सर्वांनी समर्थन करायला हवे, असे फडणवीस म्हणाले.

लवकरच मोठा खुलासा करणार

देशाच्या शत्रूला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये. माझ्याकडे जितके पुरावे होते, ते मी सर्व यंत्रणांना दिले होते. जर मलिक यांचा राजीनामा घेणार नसतील तर राज्यातील राजकारणाचा स्तर आणखी खालावेल. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठीशी उभे राहते, याचा देशात संदेश चांगला जाणार नाही. महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधी कसे खोटे पुरावे व साक्षी गोळा करतात, यासंदर्भात येत्या काही दिवसांत मोठा खुलासा करणार, असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिक