शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

१५० च्या आकड्याचं काय झालं?; अजित पवारांचा भाजपला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 18:48 IST

भाजपने जनतेला गृहित धरू नये. जनतेच्या मनात काय आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे जनता कदापि खपवून घेणार नाही. भाजप नेते गुजरातमध्ये १५० जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देसमविचार पक्षांनी एकत्र आल्यास वेगळेच चित्र देशापुढे येईल

आॅनलाईन लोकमतनागपूर : भाजपने जनतेला गृहित धरू नये. जनतेच्या मनात काय आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे जनता कदापि खपवून घेणार नाही. भाजप नेते गुजरातमध्ये १५० जागा जिंकू असा दावा करीत होते. त्या आकड्याचं काय झालं? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपस्थित केला. विधानभवन परिसरात गुजरात निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.अजित पवार म्हणाले, गुजरातमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्याचे निश्चित झाले असून. भाजप शंभरी पार जाताना दिसत आहे. सुरुवातीला भाजपचे काही नेते म्हणत होते गुजरातमध्ये १५० जागांशिवाय बोलूच नका, पण सुरुवातीला जेव्हा निकाल आले, तेव्हा काही काळ काँग्रेसने आघाडी बनवली होती. तेव्हा सर्व जगाने पाहिले, आपली लोकशाही किती प्रगल्भ आहे. मी सांगेल ती पूर्वदिशा हे जनता कदापि सहन करत नाही. येणाऱ्या काळात देशात निश्चितच मोठा बदल जनता घडवेल. या निकालाने विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे. किती बारकाईने विचार करून लोक मतदान करतात, मला खात्री आहे. जेथे जेथे विरोधी पक्ष काम करतोय, तेथे कार्यकर्त्यांमध्ये आज उत्साहाचे वातावरण आहे.काँग्रेस प्रमुख राहुल गांधी व त्यांच्या चमूने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी विरुध्द राहुल गांधी असेच राजकारण बघायला मिळाले. ज्या पध्दतीने राहुल गांधी आणि त्यांच्या चमूनी काम पाहिले त्यावर जनतेने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते. जे २०१९ चा विचार न करता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करा असे सांगत होते त्यांच्यासाठी हा निकाल म्हणजे एक चपराक आहे. गुजरातमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी व्हावी असं वाटत होतं. काय घडले याबाबत माहिती नाही. मात्र, भविष्यात समविचारी पक्षांनी एकत्र आल्यास एक वेगळेच चित्र देशापुढे येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Ajit Pawarअजित पवार