शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओई’ शोध सुरू, वित्त अधिकाऱ्यांचे काय?

By admin | Updated: August 28, 2014 02:05 IST

कुलसचिव वगळता ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. विलास रामटेके यांनी परीक्षा नियंत्रकपद सोडल्यानंतर डॉ. श्रीकांत कोमावार यांना तात्पुरता पदभार

नागपूर : कुलसचिव वगळता ‘प्रभारी’ अधिकाऱ्यांच्या भरवशावर विद्यापीठाचा कारभार सुरू आहे. विलास रामटेके यांनी परीक्षा नियंत्रकपद सोडल्यानंतर डॉ. श्रीकांत कोमावार यांना तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. परंतु पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या असून, यासंदर्भात जाहिरात जारी करण्यात आली आहे. परंतु हीच तत्परता वित्त व लेखा अधिकाऱ्यांचे पद भरण्याकरिता का दाखविण्यात येत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.विलास रामटेके यांनी मुंबई येथील ‘जे.जे. स्कूल आॅफ आर्किटेक्चर’ येथे ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होण्याचा निर्णय घेतला. अगोदरच अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असल्यामुळे परीक्षा विभागावर मोठा ताण आहे. ‘बीसीयूडी’ संचालक (बोर्ड आॅफ कॉलेज अ‍ॅन्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट) डॉ. श्रीकांत कोमावार यांच्याकडे १५ सप्टेंबरपर्यंत परीक्षा नियंत्रकपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. परीक्षा विभागासमोरील आव्हाने पाहता, प्रशासनाने लवकरात लवकर परीक्षा नियंत्रकपद भरण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता विद्यापीठाने बुधवारी जाहिरात प्रसिद्ध केली. इच्छुक उमेदवारांकडून विद्यापीठाने १२ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागितले आहेत. त्यानंतर यातून नेमके किती अर्ज वैध आहेत, हे छाननी प्रक्रियेत पाहण्यात येईल. एकूण प्रशासकीय प्र्रक्रिया पाहता परीक्षा नियंत्रकांची प्रत्यक्ष निवड होण्यासाठी आॅक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(प्रतिनिधी)वित्त व लेखा अधिकाऱ्यांची निवड कधी?दरम्यान, विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारीपदी पूर्णवेळ अधिकारी नाही. डॉ. पूरण मेश्राम यांच्याकडे सध्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. हे पद भरण्यासाठी विद्यापीठाने अद्यापही जाहिरात का दिली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या पदावर डॉ. पूरण मेश्राम यांची वित्त अधिकारी म्हणून फेरनियुक्ती करण्याच्या मुद्यावर जुलै महिन्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही. बैठकीत डॉ. डी.के. अग्रवाल यांनी डॉ. मेश्राम यांची या पदावर फेरनियुक्ती करण्यात यावी, या आशयाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता व सदस्यांनी त्यांच्या बाजूने मत व्यक्त केले होते. परंतु डॉ. मेश्राम यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ नुकताच संपला असल्याने, त्यांची फेरनियुक्ती करण्यासाठी काही प्रशासकीय प्रक्रियांची अडचण येऊ शकते का, हे तपासण्यासाठी राज्यपाल कार्यालयाकडे संबंधित प्रकरण पाठविण्यात आले. यासंदर्भात प्रक्रिया कुठपर्यंत आली याबाबत विद्यापीठाने मौन बाळगले आहे. प्रसिद्धी समन्वयक श्याम धोंड यांनीदेखील यासंदर्भात नेमकी माहिती नसल्याचे स्पष्ट केले.