शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्सिनसाठी काय करू ? हेल्पलाईनवर होतेय विचारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:06 IST

कोरोना रुग्णांचे कॉल घटले : लसीकरणाची युवकांत उत्सुकता लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या ...

कोरोना रुग्णांचे कॉल घटले : लसीकरणाची युवकांत उत्सुकता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध करणे, विलगीकरण, क्वारंटाईन सेंटर यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांना डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी महापालिका मुख्यालयात कोरोना वॉर रूम सुरू करण्यात आली. येथील हेल्पलाईनवर एप्रिल महिन्यात कॉल्सचे प्रमाण प्रचंड वाढले होते. तीन पाळ्यांत डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती. परंतु, जून महिन्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरताच बेड उपलब्धतेबाबत येणारे कॉल जवळपास बंद झाले आहेत. आता व्हॅक्सिनेशनसाठी कॉल येत आहेत. यात प्रामुख्याने १८ वर्षांवरील युवकांचा समावेश आहे.

....

रुग्ण व कॉल घटले

एप्रिल महिन्यात कोरोना संक्रमणाचा प्रकोप सुरू असताना हेल्पलाईनवरील कर्मचाऱ्यांना सतत कॉल येत होते. मात्र, जून महिना सुरू होताच रुग्णांची संख्या कमी झाल्याने मागील दोन आठवड्यांत हेल्पलाईनवर येणारे कॉल कमी झाले आहेत. २० जूनला तर बेड संदर्भात एकही कॉल आला नाही. आरोग्याविषयी माहिती विचारली गेली नाही. मात्र, लसीकरणाबाबत विचारणा होत असल्याची माहिती

येथील अधिकाऱ्यांनी दिली.

...

आम्हाला लस कधी मिळणार?

१८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने ३० वर्षांवरील नागरिकांना १०६ केंद्रांवर लसीचे डोस दिले जात होते. बुधवारी १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. शासनाने घोषणा केल्याने १८ वर्षांवरील युवक लसीसाठी कालपर्यंत मनपाच्या हेल्पलाईनवर कॉल करून विचारणा करतात. आम्हाला लस कधी मिळणार? यासाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कुठली लस उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिन चांगली की कोविशिल्ड अशी विचारणा करतात.

............

तारीख कॉल्स रुग्ण

१ मे २८२ २३२

१५ मे १७६ १२५

६ जून ३६ ११

...

- पहिल्या लाटेत आलेले एकूण कॉल्स -५०,०००

-दुसऱ्या लाटेत आलेले कॉल्स - १,५००००

(सर्व कॉलची नोंद होत नसल्याने यात बदल असू शकतो. )