शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एम्सच्या डाॅक्टरांनी नवे काय केले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : सलाईन गार्गल (चूळ भरणे/गुळणी) द्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी ...

निशांत वानखेडे

नागपूर : सलाईन गार्गल (चूळ भरणे/गुळणी) द्वारे काेराेना संक्रमणाची तपासणी करण्याचे तंत्र विकसित करणाऱ्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संसाेधन संस्था (नीरी) च्या संशाेधनावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्लीने घेतलेल्या आक्षेपामुळे नवीन वादाला ताेंड फाेडले आहे. एम्सच्या डाॅक्टरांनी गुळणीद्वारे काेराेना तपासणी करण्याचे तंत्र आपण विकसित केल्याचा दावा करीत भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर) ने दुर्लक्ष केल्यामुळे या संशाेधनाचे श्रेय नीरीला दिले गेल्याचा आराेप एम्सच्या निवासी डाॅक्टरांनी केला आहे. मात्र एम्सने नवीन काय केले, असा सवाल करीत जुन्याच संशाेधनावर काम करून श्रेय घेण्यासाठी खटाटाेप चालविला असल्याचा आराेप नीरीच्या संशाेधकांनी केला आहे.

या पद्धतीचे संशाेधन करणाऱ्या नीरीच्या वैज्ञानिकांच्या मते एम्सने सुरू केलेल्या कामात नवीन काही नव्हते. सलाईन गार्गलद्वारे विविध आजारांची तपासणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही वर्षांपासून कार्य केले जात आहे आणि याबाबत विविध सायन्स जर्नलमध्ये प्रबंध प्रकाशितही झाले आहेत. याच आधारावर दिल्लीच्या एम्सने त्याच संशाेधनावर काम केले. याउलट नीरीने महिनाभरापूर्वी यावर काम सुरू करून तंत्र विकसित करण्यात यश मिळविले व त्याचा उपयाेगही सुरू करणे शक्य झाल्याचे सांगितले.

एम्सचा दावा

- सर्वात आधी एम्सने सलाईन गार्गलचे नमुने घेण्यास सुरुवात केली.

- ५० काेराेना संक्रमित रुग्णांचे नाेजल स्वॅब आणि गार्गलचे नमुने गाेळा करून आरटीपीसीआर तपासणी केली गेली.

- दाेन्ही प्रकारांनी केल्या गेलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष एकसारखे हाेते.

- गेल्या वर्षी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये हे संशाेधन प्रकाशित झाले हाेते.

- आयसीएमआरने या संशाेधनाकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे संशाेधनाचे श्रेय नीरीला गेले.

नीरीचा दावा

- काेराेना तपासणीमध्ये आरएनए वेगळा करणे हा महत्त्वाचा भाग आहे व त्यासाठी आरएनए एक्स्ट्रॅक्शन किटची गरज पडते. नीरीने एक ‘बफर साेल्यूशन’ तयार करून ही गरजच संपविली.

- गार्गलचे नमुने साेल्यूशनमध्ये मिसळून अर्धा तास रूम टेम्परेचरमध्ये ठेवल्यानंतर ९० अंश डिग्रीमध्ये तापविल्यास नमुन्यातील आरएनए सहज वेगळा केला जाताे व त्यानंतर तीन तासात रुग्णाच्या काेराेना चाचणीचा निकाल काढणे शक्य हाेते.

- नागपूर शहरात या पद्धतीचा उपयाेग करून तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

- लवकरात लवकर लाेकांच्या उपयाेगात यावे म्हणून नीरीने पेटंट घेण्याकडे लक्ष दिले नाही.

- एम्सने संशाेधन केले तर वर्षभरापासून काम का सुरू केले नाही? केवळ क्रेडिट घेण्यासाठी खटाटाेप चालला आहे.