शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धारिवाल, आयडियलकडून काय दराने वीज खरेदी करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 04:42 IST

महाजनको कंपनी स्वत:कडील कोळसा धारिवाल व आयडीयल या खासगी कंपन्यांना स्वस्त दरामध्ये विकून त्यांच्याकडील वीज महागड्या दरात खरेदी करीत असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

नागपूर : महाजनको कंपनी स्वत:कडील कोळसा धारिवाल व आयडीयल या खासगी कंपन्यांना स्वस्त दरामध्ये विकून त्यांच्याकडील वीज महागड्या दरात खरेदी करीत असल्याची माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. परिणामी, न्यायालयाने महाजनकोला यावर एका आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश दिला.यासंदर्भात उच्च न्यायालयात दहावर जनहित याचिका प्रलंबित आहेत. याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. धारिवाल व आयडीयलला काय दराने कोळसा विकला जातो व त्यांच्याकडून किती रुपयांना वीज खरेदी केली जाते या प्रश्नांची उत्तरे महाजनकोला प्रतिज्ञापत्रावर मागण्यात आली.आकस्मिक परिस्थितीसाठी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये किमान २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा ठेवणे आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रीय वीज प्राधिकरणने मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. परंतु, महाजनकोच्या बहुतेक औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांत २२ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा नाही. गेल्या २३ फेब्रुवारीपर्यंत महाजनकोच्या चंद्रपूर प्रकल्पात ४ लाख ७० हजार, पारसमध्ये ४१ हजार, परळीमध्ये १ लाख ३५ हजार, नाशिकमध्ये ६६ हजार, भुसावळमध्ये ७५ हजार, कोराडीमध्ये १ लाख ४२ हजार तर, खापरखेडामध्ये १ लाख ३८ हजार टन कोळशाचा साठा होता. परिस्थितीत आजही समाधानकारक बदल घडलेला नाही. असे असताना महाजनको स्वत:कडील कोळसा धारिवाल व आयडीयल या खासगी कंपन्यांना विकून त्यांच्याकडून महागड्या दरात वीज खरेदी करीत आहे. तसेच, घरगुती कोळशाचा तुटवडा भासत असल्याचे कारण सांगून कोळसा आयातही करीत आहे. हे विरोधाभासी मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.>जामीनपात्र वॉरन्ट मागेराज्यातील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कशाप्रकारे आवश्यक कोळसा पुरवठा केला जाईल याची माहिती देण्यात आली नाही म्हणून न्यायालयाने कोल इंडियाचे अध्यक्ष व वेकोलिचे अध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावले होते. त्यानंतर न्यायालयाला समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आल्यामुळे वॉरन्ट मागे घेण्यात आले.