शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समितीने निकष कशासाठी बदलले?

By admin | Updated: June 25, 2015 02:58 IST

ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सायकल वाटप केले जाते.

सायकल खरेदीचा घोळ : वादात अडकले वाटपनागपूर : ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत सायकल वाटप केले जाते. परंतु शिक्षण समितीने प्रचलित पद्धतीला फाटा देत एकाच साहित्याच्या दोन वेगवगेळ्या निविदा काढण्याचा अफलातून निर्णय घेतला. संशय निर्माण झाल्याने प्रचलित निकष कशासाठी बदलविण्यात आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.समितीच्या सदस्यांना या निर्णयाची माहिती होऊ नये यासाठी सदस्य उपस्थित असूनही मुद्दामच सभापती अनुपस्थित होते. ही बैठक तहकूब करून सदस्य निघून गेल्यानंतर घेण्यात आली. यात सायकल व गणवेश पुरवठ्याबाबतचे निकष बदलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सायकल खरेदी करताना आजवर मुले व मुली असा फरक करण्यात आला नव्हता. एकत्रित निविदा काढण्याची प्रचलित पद्धत होती. परंतु एकत्रित खरेदी एक कोटीची असल्याने यासाठी सभागृहाची मंजुरी घ्यावी लागणार होती. याला फाटा देण्यासाठी वेगवेगळ्या दोन निविदा काढण्यात आल्याचा आरोप समितीच्या काही सदस्यांनी केला आहे. बाजारभावानुसार ३६०० रुपये दराने २७०० सायकली खरेदी करावयाच्या आहेत. मोठी खरेदी असल्याने या रकमेत चांगल्या दर्जाच्या सायकली मिळू शकतात. परंतु उत्पादक वा मोठा पुरवठादार नसलेल्या कंत्राटदाराला हे काम देण्यात आल्याची माहिती आहे. यासाठी सभापतींनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून पुरवठा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा प्रकार शिक्षण समितीच्या सदस्यांच्या निदर्शनास आल्याने समितीच्या सदस्यात वाद निर्माण झाला आहे. यात काँग्रेसच्याही काही सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. याचे पडसाद २९ जूनला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)