शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विशिष्ट वेळीच सरकारचा गाढवपणा का?

By admin | Updated: July 20, 2016 02:09 IST

विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळीच मी विदर्भाचा मुद्दा उचलतो असा आरोप होतो. प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा संग्रहित ठेवून

श्रीहरी अणे : सत्तेच्या राजकारणामुळे वेगळ्या विदर्भासंदर्भात गडकरी, फडणवीसांची अडचणनागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळीच मी विदर्भाचा मुद्दा उचलतो असा आरोप होतो. प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा संग्रहित ठेवून त्यावर मी बोलत नाही. सरकारने वेळीच शहाणपणा दाखवला तर मला अधिवेशनाच्या वेळी बोलावे लागणार नाही. परंतु विशिष्ट वेळी सरकारचा गाढवपणा का होतो, असा प्रश्न राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी उपस्थित केला. राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत जागांचे विभागनिहाय आरक्षण बंद व्हावे या मागणीसंदर्भात ते नागपुरात बोलत होते.वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कुठेही मागे पडलेला नाही. विदर्भावर अन्याय होत असेल तर मी त्यावर अधिवेशन काळात बोलणे गैर नाहीच. राजकीय पुढाऱ्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी हिंमत दाखविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे वेगळ्या विदर्भाबाबत सकारात्मक आहेत. परंतु ते यासाठी प्रयत्न करत नसल्याचे चित्र दुर्दैवी आहे. सत्ता टिकवून ठेवण्याची कसरत त्यांना करायची आहे व सत्तेच्या राजकारणामुळे त्यांची अडचण होत आहे, असे अ‍ॅड.अणे म्हणाले. (प्रतिनिधी)वैद्यकीय प्रवेशात विभागनिहाय आरक्षण नकोराज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विभागनिहाय आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी जागा मिळतात. जास्त जागांचा फायदा उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होतो. परंतु विदर्भातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनदेखील प्रवेश मिळत नाही. गुणवत्ता यादीत मागील क्रमांकावर असलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तेथील महाविद्यालयात सहज प्रवेश मिळतो. विदर्भातील विद्यार्थ्याला मात्र प्रवेश नाकारण्यात येतो ही बाब अन्यायकारक आहे, असा आरोप अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केला. नियमांनुसार राज्य शासनाने गुणवत्ता यादीच्या आधारावरच प्रवेश दिले पाहिजेत. ही बाब न्यायप्रविष्ट असून मुख्यमंत्र्यांनादेखील निवेदन देणार असल्याचे अ‍ॅड. अणे यांनी सांगितले. ९ आॅगस्ट रोजी गडकरींच्या घरासमोर आंदोलनकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सत्ता आल्यास विदर्भ वेगळे राज्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासंदर्भात त्यांनी मौन साधल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे त्यांच्या महाल येथील निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन राहणार आहे. आघाडीतील विविध संघटना यात सहभागी होतील व मी स्वत:देखील येण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती अ‍ॅड.अणे यांनी यावेळी दिली. २५ आॅगस्ट रोजी ‘ईपीएस’च्या मुद्यावरून गडकरींच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनात मी उपस्थित राहील, असे त्यांनी सांगितले.