शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘फेक न्यूज’च्या गुन्ह्यांचे ‘रिअल’ आकडे कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:48 IST

Fake News Nagpur News नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे.

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सबकुछ ऑनलाईन’च्या जमान्यात ‘सोशल मीडिया’वर ‘फेक न्यूज’चे प्रमाण वाढलेले दिसून येते. मात्र प्रशासकीय नोंदींमध्ये अद्यापही हे प्रमाण नगण्यच आहे. नागपूर पोलिसांनुसार चार वर्षांत नागपुरात ‘फेक न्यूज’ पाठविणाऱ्या १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. २०१९ साली हाच आकडा तीन इतका होता. मात्र ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीमध्ये मात्र ही संख्या शून्य इतकी दाखविण्यात आली आहे. त्यामुळे नेमके कुणाचे आकडे खरे व कुणाकडून ‘फेक’ माहिती देण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विविध वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांचे ‘वेबपोर्टल्स’ असून त्यावर नियमितपणे बातम्या ‘अपडेट’ होतात. परंतु अनेकदा ही वर्तमानपत्रे किंवा वृत्तवाहिन्यांच्या नावाखाली खोटे वृत्त तयार केले जाते व ते ‘सोशल मीडिया’वर पसरविले जाते. परंतु असे करणे हा प्रकार ‘सायबर’ गुन्ह्यांमध्ये येतो व असे करणाऱ्यांविरोधात कलम ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

नागपूर पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या आकडेवारीनुसार २०१६ सालापासून नागपुरात ‘फेक न्यूज’संदर्भात विविध तक्रारी झाल्या व एकूण १२ प्रकरणात गुन्हे दाखल झाले. २०१६ मध्ये ४, २०१७ मध्ये २, व २०१८ साली तीन व २०१९ मध्ये तीन गुन्हे दाखल झाले. परंतु ‘एनसीआरबी’च्या २०१७, २०१८ व २०१९ सालच्या अहवालात मात्र या गुन्ह्यांचा आकडा शून्य दाखविण्यात आला आहे. अशा स्थितीत माहितीचा अधिकार खरा की ‘एनसीआरबी’ची माहिती, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

कारवाईचे प्रमाण कधी वाढणार?राज्यभरात ‘फेक न्यूज’ दिसून येत असल्या तरी यासंदर्भात कारवाईचे प्रमाण फारच कमी आहे. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत राज्यात केवळ २० गुन्हे दाखल झाले. ‘फेक न्यूज’विरोधात तक्रारीसाठी लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूज