शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हृदयविकार जडण्याचे वय घटलेय काय?

By admin | Updated: June 29, 2016 02:48 IST

काही वर्षांपूर्वी हृदयविकार म्हटले की उतरत्या वयाची व्यक्ती डोळ्यांपुढे येत होती. परंतु, सध्या चित्र बदलले आहे.

परिहार यांच्या मृत्यूमुळे प्रश्न उपस्थित : व्यस्त जीवन जगणाऱ्यांमध्ये भीतीनागपूर : काही वर्षांपूर्वी हृदयविकार म्हटले की उतरत्या वयाची व्यक्ती डोळ्यांपुढे येत होती. परंतु, सध्या चित्र बदलले आहे. तंदुरुस्त राहण्याच्या वयात अनेक व्यक्ती हृदयविकाराचे बळी ठरत आहेत. दोन दिवसांपूर्वी शहरातील आकाश परिहार या तरुण वकिलाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे वय अवघे ३४ वर्षे होते. एवढ्या कमी वयात हृदयविकार जडण्याची काय कारणे असू शकतात, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. हृदयविकार जडण्याचे वय घटलेय काय, असे वाटायला लागले आहे. व्यस्त जीवन जगणाऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.अ‍ॅड. आकाश परिहार विश्वकर्मानगर येथील रहिवासी होते. ते प्रामुख्याने उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय करायचे. त्यांना मिमिक्रीचा छंद होता. यामुळे ते सर्वांना परिचित होते. वकिलांचे जीवन धावपळीचे असते. यामुळे त्यांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी फार कमी वेळ मिळतो. परिहार यांचे असेच झाले. वकिली व्यवसायातील व्यस्ततेमुळे त्यांनी हृदयाच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले. परिणामी २५ जून रोजी आलेला हृदयविकाराचा जोरदार धक्का त्यांचे प्राण हिरावून गेला. आकाश परिहार हे एक ताजे उदाहरण असून, आतापर्यंत हृदयविकाराने अनेकांचे तरुण वयातच बळी घेतले आहेत. यामुळे हा आजार केवळ उतरत्या वयात होतो, असे समजण्याची परिस्थिती आज राहिलेली नाही. तेव्हा सर्वांनी हृदयाची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे. हृदयविकाराची लक्षणे व उपचारहृदयविकार असणाऱ्या रुग्णांच्या छातीत व पाठीत दुखायला लागते. हे दुखणे सुरू असताना घाम येतो. हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी प्रत्यकाने ईसीजी, इको किंवा टीएमटीची चाचणी करणे आवश्यक आहे. चाचणी पॉझिटिव्ह आल्यास अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी किंवा पेसमेकर हे उपचार करण्यात येतात. या उपचार पद्धती आजाराच्या स्वरूपानुसार उपयोगात आणल्या जातात.(प्रतिनिधी)