शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या तूरडाळीचे काय?

By admin | Updated: March 28, 2016 03:10 IST

तुरीच्या डाळीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेऊन, साठेबाजांवर कारवाई करण्यात आली. यात अन्न पुरवठा

नागपूर : तुरीच्या डाळीचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेऊन, साठेबाजांवर कारवाई करण्यात आली. यात अन्न पुरवठा विभागाने मोठ्या प्रमाणात तूर जप्त केली. प्रशासनाने हीच तूर भरडा करून डाळीच्या स्वरूपात १०० रुपयांत विकण्याची अट व्यापाऱ्यांना टाकली. परंतु व्यापाऱ्यांना ते परवडणारे नसल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे आजही जप्त केलेली तूर गोदामात पडली आहे. तिची उचल न झाल्यामुळे खराब होत असल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यात तीन व्यापाऱ्यांकडून ७६८ क्विंटल तूर जप्त करण्यात आली होती. तुरीची भरडाई करून १०० रुपयांत डाळ विक्री करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांकडून १००० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले होते. यातील एका व्यापाऱ्यांनी ८४ क्विंटल डाळ विकल्याची माहिती आहे. परंतु उर्वरित दोन व्यापाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विभागाने त्यांना डाळीची उचल करण्यास नोटीस बजावल्या. परंतु त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केल्याने अद्यापही जप्त केलेली तूर गोदामात पडून आहे. दिवाळीच्या काळात डाळींच्या किमतीचा भडका उडाला होता. डाळींचे दर आटोक्यात आणण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त साठा केलेल्या व्यापाऱ्यांच्या गोदामावर छापे टाकण्यात आले. डाळींचे साठ जप्त करण्यात आले. मात्र व्यापारी भाव कमी करायला तयार झाले नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी जप्त केलेली डाळ परतच नेली नाही. शासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाने साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न करता त्यांच्या माध्यमातूनच डाळीची विक्री करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या निर्णयाला व्यापाऱ्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दोन व्यापाऱ्यांनी डाळ विक्रीची तयारी दर्शविली नाही. दरम्यान जप्त डाळीचा लिलाव करण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. परंतु लिलाव अद्यापही झाला नाही. अनेक महिने डाळ पडून असल्याने ती जवळपास खराब झाल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)तूरडाळ दर्जेदार नव्हतीचहे दोन्ही व्यापारी मुंबई आणि नाशिक येथील असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. व्यापाऱ्यांच्या मते जप्त केलेली तूर दर्जेदार नव्हती. त्यामुळे त्यांनी कदाचित उचल केली नसेल. परंतु जप्त केलेल्या तुरीचा लिलाव करण्यात येईल. - नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी