शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
4
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
5
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
6
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
7
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
8
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
9
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
10
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
11
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
12
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
13
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
14
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
15
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
16
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
17
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
18
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
19
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
20
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

सहकाराच्या माध्यमातून ‘वेस्ट टू वेल्थ’ शक्य

By admin | Updated: February 29, 2016 02:55 IST

टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे,...

नितीन गडकरींचे यांचे प्रतिपादन : सहकार भारतीच्या अधिवेशनाचा समारोपनागपूर : टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सहकारी भारतीच्या विदर्भ शाखेतर्फे रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय अधिवेशनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे व विदर्भ शाखेचे अध्यक्ष केशव दांडेकर उपस्थित होते. गडकरी यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘वेस्ट टू वेल्थ’चे महत्त्व पटवून सांगितले. केसांपासून शेती उपयोगी अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तर, शौचालयाच्या पाण्यापासून सीएनजी वायू तयार करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी गाईचे महत्त्वही समजावून सांगितले. गोमूत्र प्राशन केल्यामुळे तब्येत ठणठणीत राहते. गाईच्या तुपाला मोठी मागणी आहे. देशी गाई पाळण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. राजस्थानातील साहिवाल व गीर या गाईपासून जन्मलेल्या बैलाचे वीर्य वापरून महाराष्ट्रातील देशी गाई दुधाळू करता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.रामदेवबाबा गडचिरोली, अमरावती व नागपूर येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व्हावे व त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविली जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.