शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी विहीर व तलावाचे पाणी

By admin | Updated: September 22, 2015 03:50 IST

गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे

नागपूर : गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम टँकमध्ये पिण्याचे पाणी आणून टाकले जात असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच जलकुंभावरून पाणी देणे बंद करण्यात आले. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी उपलब्ध पाण्याचा वापर करण्यात यावा. ज्या ठिकाणी पर्याय नसेल तेथेच जलकुंभाच्या पाण्याचा वापर क रण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाने सोमवारी दिले. शहरातील तलावांचे संवर्धन करण्यासाठी व जलप्रदूषण रोखण्यासाठी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन तलावात करू नये. यासाठी कृत्रिम टँक निर्माण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तसेच तलावाच्या किनाऱ्यावर ११८ ठिकाणी कृ त्रिम तळे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील अर्ध्याहून अधिक कृत्रिम टँक तयार झाले आहेत. फुटाळा तलाव, सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, सोनेगाव तलाव आदी भागात कृत्रिम टँक उभारण्यात आले. प्रशासनाने जलकुंभावरील पाणी देणे बंद केल्याने फुटाळा तलावाच्या काठावरील कृत्रिम टँकमध्ये तलावातील पाण्याचा वापर करण्यात आला. इतर तलावच्या ठिकाणी तसेच शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कृ त्रिम तळ्यासाठी विहीर वा तलावाच्या पाण्याचा वापर करण्यात आला. कृत्रिम तळ्यासाठी पर्यायी पाण्याचा वापर करण्यात आल्याने लाखो लिटर पिण्याच्या पाण्याची बचत झाली आहे. तसेच टँकरवरील खर्चातही बचत झाली आहे. शहरातील काही भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. टँकरची प्रतीक्षा करावी लागते. दुसरीकडे कृत्रिम टँकसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. पिण्याच्या पाण्याचा वापर न करता जिथे-जिथे शक्य आहे तिथे पर्यायी पाण्याचा वापर क रण्याच्या सूचना केल्याची माहिती जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)शक्य तिथे पर्यायी पाण्याचा वापरसोनेगाव तलावातील पाणी कृत्रिम टँकसाठी वापरणे शक्य आहे. परंतु फुटाळा तलाव, गांधीसागर तलावातील पाणी वापरण्याजोगे नाही. दक्षिण नागपुरात कृत्रिम टँकसाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. जिथे-जिथे जलकुंभातील पाण्याला पर्याय आहे. अशा ठिकाणी या पाण्याचा वापर केला जाणार आहे. पर्याय नसेल तेव्हाच जलकुंभाच्या पाण्याचा वापर करण्याच्या सूचना जलप्रदाय विभागाला केल्या आहे. प्रवीण दटके, महापौर, मनपा पर्याय नसेल तेथेच वापरकृत्रिम टँकसाठी पाण्यासाठी विहिरीच्या पाण्याचा वापर केला जात आहे. तलावातील पाणी घाण दिसते. ते वापरण्याजोगे नाही व दुसरा पर्याय नाही अशाच ठिकाणी जलकुंभातील पाण्याचा वापर करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी या पाण्याचा असा वापर केला जाणार आहे. तीन दिवसच याची गरज भासणार आहे. श्रावण हर्डीकर, आयुक्त, मनपा