शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

रणजी जेतेपदाच्या यशाचे विदर्भाने केले सहर्ष स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 10:55 IST

 विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला.

ठळक मुद्देशहरात आतषबाजी मिठाई वाटून साजरा केला आनंद

आॅनलाईन लोकमतनागपूर : फैज फझलच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघाने सोमवारी इतिहास घडविताना संघाला रणजी चषक पटकावून दिला. अंतिम लढतीत बलाढ्य दिल्ली संघाविरुद्ध पहिल्या दिवसापासून वर्चस्व गाजवणाऱ्या विदर्भ संघाने सोमवारी चौथ्या दिवशी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या जेतेपदामुळे विदर्भाच्या क्रिकेट वर्तुळात नवा उत्साह संचारला. आज शंकरनगर, व्हीसीए सिव्हिल लाईन्स परिसर, गोकुळपेठ चौक यासारख्या शहरातील गजबजलेल्या परिसरात चाहत्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला. ‘चॅम्पियन’ एका रात्रीत घडत नसतात. त्यासाठी सुरुवातीपासून मेहनत घ्यावी लागते. आज विदर्भ संघाच्या यशाने त्याची प्रचिती आली. विदर्भाने ६० वर्षानंतर जेतेपदावर नाव कोरताना देशातील क्रिकेट वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडले.

अविश्वसनीय कामगिरीविदर्भ क्रिकेट संघ कधी रणजी करंडक पटकावेल, हे दिवास्वप्नच होते. मात्र, या संघाने ते स्वप्न पूर्ण करून दाखवीत विदर्भ क्रिकेट संघही ही कामगिरी करून दाखवू शकतो, हे सिद्ध केले आहे. एक माजी खेळाडू म्हणून रणजी करंडक विदर्भ संघाच्या हाती कधी बघायला मिळेल का, याची शक्यताच वाटत नव्हती. मात्र, या तरुण खेळाडूंनी उत्तम सांघिक खेळ करीत ही कामगिरी करून दाखविली. हा क्षण पाहण्यासाठी ६० वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर हा क्षण आल्याने नक्कीच तो मोठा आहे, याचे सर्व श्रेय खेळाडू व सपोर्ट स्टाफला आहे. त्यांनी चांगला खेळ केला. त्यामुळे हा सर्वांसाठीच आनंदाचा क्षण आहे.-प्रकाश सहस्रबुद्धे, विदर्भ क्रिकेट संघाचे माजी कर्णधार

ऐतिहासिक क्षणविदर्भ क्रिकेटच्या प्रत्येक आजी-माजी खेळाडूंचे हे स्वप्न सध्याच्या संघाने पूर्ण करून दाखविले. ज्याप्रकारे संघ यंदाच्या हंगामात खेळला ती खरोखरच ती खेळी अद्वितीय आहे. संघाचे हे विजेतेपद हा प्रत्येकासाठी ऐतिहासिक क्षण आहे. फैज फजलच्या नेतृत्वातील संघाने करून दाखविलेली कामगिरी खरोखर मोठी आहे. यापूर्वी विदर्भ क्रिकेटकडे शुद्र नजरेने बघण्यात येत होते. मात्र, आता संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलेल. विदर्भ संघाच्या कामगिरीची दखल आता सर्वांनाच घ्यावी लागणार आहे. यात मोठे श्रेय व्हीसीएचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर, सध्याचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य, अद्वैत मनोहर यांचेही आहे. या सर्वांनी विदर्भ क्रिकेटच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याचेच हे फळ आहे.-प्रवीण हिंगणीकर, माजी रणजीपटूकौतुकास्पद कामगिरीविदर्भ क्रिकेट संघातील नवख्या व अनुभवी खेळाडूंनी यंदाच्या हंगामात रणजी करंडकात जी कामगिरी करून दाखविली ती खरोखरच कौतुकास्पद होती. हा विजय विदर्भातील क्रिकेटपटूंची मानसिकताच बदलविणारी नाही तर त्यांच्याकडे इतर संघांचा जो आतापर्यंत बघण्याचा दृष्टिकोन होता तोसुद्धा बदलणार आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या क्रिकेटपटूंनी वैदर्भीय क्रिकेटप्रेमींना दिलेले हे गिफ्ट आहे. पण, केवळ या विजेतेपदावर समाधान मानून चालणार नाही. आता पुढेही कामगिरीत हेच सातत्य कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी संघावर आली आहे. त्यामुळे आता संघाला नियमितपणे रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरी गाठावी लागणार आहे. संघाचे या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन.-सुहास फडकर, माजी कर्णधार विदर्भ संघजबाबदारी वाढलीरणजी करंडकाचे विजेतेपद, तेसुद्धा इतक्या प्रदीर्घ वर्षांच्या कालावधीनंतर ही खरोखरच एक स्वप्नपूर्ती आहे. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरी, एकदिवसीय स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्याची कामगिरी संघाने केली होती. मात्र, रणजी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ही खऱ्या अर्थाने मोठी अचिव्हमेंट आहे. अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले. पण, आता या कामगिरीसोबतच जबाबदारीही वाढली आहे. आता संघाला केवळ यावर समाधानी होऊन चालणार नाही तर पुढेही यात सातत्य ठेवावे लागणार आहे. प्रत्येक वर्षी अंतिम उपांत्य फेरी, अंतिम फेरी कशी गाठता येईल यासाठी असाच खेळ करावा लागणार आहे तरच संघाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. पण, विदर्भाच्या या कामगिरीची आता प्रत्येकालाच दखल घ्यावी लागणार आहे, हे नक्की.-प्रीतम गंधे, माजी कर्णधार, विदर्भ संघ

खरे चॅम्पियन्सयंदाच्या हंगामात विदर्भ क्रिकेट संघाने जी कामगिरी केली व अंतिम फेरीत दिल्लीविरुद्ध जसा खेळ केला त्यातून विदर्भ संघ हाच विजेतेपदाचा खरा दावेदार होता, हेच दिसून येते. खरोखरच विदर्भ क्रिकेटकरिता हा क्षण अत्यंत मोठा आहे. यंदाच्या हंगामात गुरबानी, वाडकरसारखे खेळाडू पुढे आले आहेत. तर वासीम जाफरसारख्या प्रदीर्घ अनुभव असलेल्या खेळाडूच्या मार्गदर्शनामुळे या सर्व टॅलेंटेड खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे. ही खरोखरच अभिमानाची बाब आहे. कर्णधार फैज फजल, प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांची भूमिकाही विसरून चालणार नाही. प्रत्येक युवा खेळाडूंवर दाखविलेला विश्वास यामुळे हे शक्य झाले. खऱ्या अर्थाने आपण चॅम्पियन आहोत.-हेमंत वसू, माजी कर्णधार, विदर्भ संघखूप मोठा क्षणक्रिकेटपटू म्हणून विदर्भाकडून खेळताना रणजी करंडकाचे विजेतेपद पटकाविण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अखेर हे स्वप्न पूर्ण झाल्याचा मोठा आनंद आहे. संघातील युवा व अनुभवी खेळाडूंनी संपूर्ण हंगामात अनेक मोठ्या संघांना पराभूत करीत ही कामगिरी करून दाखविली. या विजयासाठी तब्बल ६० वर्षे लागली. त्यामुळे हा खूप मोठा क्षण आहे.-अमित देशपांडे, माजी रणजीपटूफैजच्या कामगिरीचा अभिमानविदर्भाच्या जेतेपदात फैजच्या नेतृत्वगुणांचा मोलाचा वाटा राहिला. मी त्याला फार पूर्वी २४ नंबरचा टी-शर्ट घालण्याचा सल्ला दिला होता. फैजमध्ये सकारात्मकवृत्ती असल्यामुळे तो यंदा यशस्वी होईल. विदर्भाला करंकड जिंकून देईल, असे भाकीत आधीच केले होते. मेहनतीला नशिबाची जोड लाभल्याने तो यशस्वी ठरला. रजनीश गुरबानी याच्यात आंतरराष्टय स्तरावर खेळण्याची क्षमता आहे. गोलंदाजीतील भेदकतेच्या बळावर तो लवकरच भारतीय संघात पदार्पण करणार, हे निश्चित. चॅम्पियन विदर्भ संघाचा सार्थ अभिमान वाटतो.- नरेंद्र बुंदे, क्रिकेटचे भाष्यकार आणि ज्योतिषीमनसे अभिनंदन फैज अ‍ॅन्ड कंपनीअखेर दिल्लीला नमवून रणजी करंडक नागपुरात आणल्याबद्दल, कर्णधार फैजसह सर्व सहकारी खेळाडू आणि कोच यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिनंदन. ही कामगिरी अशीच सुरू राहील, अशी अपेक्षा.- हेमंत गडकरी,विदर्भ प्रमुख मनसे.

टॅग्स :Ranji Trophy 2017रणजी चषक 2017