शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

वेलकम मिस्टर कमिश्नर टू नागपूर; रवींद्रकुमार सिंगल यांनी स्वीकारला पदभार

By योगेश पांडे | Updated: February 1, 2024 23:11 IST

गुंडांची दादागिरी मोडून काढणार

योगेश पांडे नागपूर : नागपुरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी गुरुवारी रात्री पदभार स्वीकारला. रात्री नागपुरात आल्यावर त्यांनी थेट पोलीस भवन गाठले व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. सलोखा-समन्वय-सुरक्षा अन् सुशासन या त्यांच्या चतु:सुत्रीचा त्यांनी पुनरोच्चार करत निवडणूकांच्या तोंडावर गुन्हे नियंत्रण व शांतता प्रस्थापित राहण्यावर भर असेल असे स्पष्ट केले. यासोबतच शहरातील गुंडगिरी व दादागिरी मोडून काढण्यात येईल अशी भूमिका मांडत त्यांनी गुंडांना थेट इशाराच दिला.

रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालयात आगमन झाले. यावेळी सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त शिवाजी राठोड, प्रमोद शेवाळे, संजय पाटील, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, अश्विनी पाटील, अर्चित चांडक, प्रामुख्याने उपस्थित होते. नागपुरातील एकूण गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन मग त्यादृष्टीने नियोजन करण्यात येईल. मात्र प्रभावी पोलिसिंगवर आपला भर असेल. विशेषत: पोलीस विभागातील सर्व सहकारी व समाजाला सोबत घेऊन काम करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या सुरक्षेप्रती आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. युवापिढी ड्रग्जच्या विळख्यात अडकते आहे. त्यामुळे अंमली पदार्थांचे जाळे मोडून काढण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येईल. शहरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी यासाठी जनतेचा एकूणच सहभाग वाढवू, असे सिंगल यांनी सांगितले.

- ‘न’पासून सुरू होणाऱ्या शहरांसोबत विशेष स्नेह

मी नागपुरात अगोदरदेखील काम केले आहे. हे शहर शांतताप्रिय आहे. ‘न’ अक्षराने सुरू होणाऱ्या शहरांसोबत माझा विशेष स्नेह आहे. नांदेड, नाशिकनंतर आता नागपुरमध्ये पोलीस दलाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

- पोलीस आयुक्तांसमोरील आव्हाने

- शहरातील वाढते गंभीर गुन्हे व निर्ढावलेले गुन्हेगार- शहरातील मुख्य मार्गांवर मोडकळीस आलेली वाहतूक व्यवस्था- सकारात्मक पोलिसींग- महिलांवरील वाढते अत्याचार, विनयभंग, अपहरण व एकूण गुन्हे- शहरातील वाढत्या घरफोड्या व चोरीची प्रकरणे- वाढते सायबर गुन्हे व आर्थिक गुन्हे- अंमली पदार्थांचे वाढते जाळे- नाईट कल्चरमध्ये सुरू असलेला उन्माद व त्यातून घडणारे गुन्हे- पोलीस कर्मचाऱ्यांमधील लाचखोरीची कीड- अकार्यक्षम डीबी पथके- शहरातील वाढते अपघात- नागपुरातील पोलीस कर्मचाऱ्यांचा फिटनेस- रेती माफियांच्या टोळ्या