शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा दोन दिवस ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST

नागपूर : हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा ...

नागपूर : हवामान विभागाने २२ आणि २३ तारखेला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. सोबतच पूर्व विदर्भातील एखाद्या ठिकाणी अतिपावसाचा इशारा दिला असून, सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. नागपुरात बुधवारी सकाळपासून पावसाने रिमझिम हजेरी लावली. यामुळे पावसाची टक्केवारी वाढली असून पिकाला पोषक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे.

वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणि आसपासच्या भागांत चक्रीवादळ सुरू झाले आहे. ३.१ किलोमीटर आणि ६.६ किलोमीटर दरम्यान समुद्रसपाटीपासून उंचीसह दक्षिण-पश्चिम दिशेने ते झुकत आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि खालच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव पडल्याने पुढील ४८ तास विदर्भात २१ ते २३ जुलैदरम्यान मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नागपूर शहरासह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच असा अपेक्षित पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. शेतीसाठी पोषक असलेल्या आणि जमिनीत मुरणाऱ्या या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

मागील २४ तासांत सकाळी आठ वाजेपर्यंत नागपुरात २.६ मि.मी. पावसाची नोंद झाली.

...

पूर्वेकडे अतिपावसाचा इशारा

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २२ आणि २३ तारखेला विदर्भात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यासोबतच पूर्वेकडील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून, सावधगिरीचा इशारा दिला आहे. २२ जुलैला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत, तर २३ तारखेला अमरावती व अन्य जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दर्शविला आहे.

....