शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

तो शस्त्रसाठा कुणाचा ?

By admin | Updated: September 22, 2015 04:13 IST

जरीपटक्यातील कपिलनगरात सोमवारी सकाळी आढळून आलेल्या घातक शस्त्रसाठ्यामुळे खळबळ उडाली. तलवारी,

नागपूर : जरीपटक्यातील कपिलनगरात सोमवारी सकाळी आढळून आलेल्या घातक शस्त्रसाठ्यामुळे खळबळ उडाली. तलवारी, कुकरी आणि मोठे चाकू असे हे शस्त्र असून, ते नेमके कुणाचे ते स्पष्ट झालेले नाही. मात्र, या शस्त्रसाठ्याने परिसरात दहशत निर्माण केली आहे.कपिलनगर,प्रजापती आटा चक्कीजवळ प्यारोबाई बलवंतसिंग (वय ६०) यांचे निवासस्थान आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता त्या घराबाहेर आल्या तेव्हा त्यांना कुंपणाजवळ एक पोते बेवारस दिसले. त्यातून चाकू, तलवारी बाहेर निघाल्याचे दिसल्याने त्यांनी शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर पोलिसांना कळविले. जरीपटका पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. बेवारस पोत्यात तलवारी, कुकरी आणि मोठे चाकू अशी एकूण १३ घातक शस्त्रे होती. ती कुणाची ही स्पष्ट झाली नाही. या भागात रात्रीनंतर समाजकंटकांचा हैदोस असतो. मध्यरात्रीनंतर गुंड शस्त्राची खेप कुणाकडे तरी घेऊन जात असावेत. नेमक्या वेळी गस्तीवरील पोलिसांचे वाहन या भागात आल्यामुळे त्यांनी शस्त्राचे पोते फेकून पळ काढला असावा, असा संशय आहे. मात्र, गस्तीवरील पोलिसांचे त्यावेळी या पोत्याकडे लक्ष गेले नसल्याचेही यातून उघड झाले आहे. जरीपटका पोलिसांनी याप्रकरणी हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)