शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

‘हम दो हमारे वो’ने केली हसवणूक

By admin | Updated: September 21, 2015 03:09 IST

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी प्रेक्षकांच्या हास्याने सभागृह फुलले.

रोटरीचे आयोजन :  देशपांडे सभागृहात प्रयोगनागपूर : डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी प्रेक्षकांच्या हास्याने सभागृह फुलले. रविवारी सायंकाळी ‘हम दो हमारे वो’ हे विनोदी नाटक सादर करण्यात आले. कौटुंबिक कथानकावर बेतलेल्या या विनोदी नाटकाने रसिकांची चांगलीच हसवणूक केली. नाटकात प्रमुख भूमिकेत अनुप सोनी होते. त्यांनी समीर सक्सेना हे पात्र रंगविले तर त्यांची पत्नी सलोनीची भूमिका स्मिता बन्सल यांनी केली. याशिवाय धीरज आणि कोमलबाबाच्या भूमिकेतील कलावंतांनीही दमदार अभिनयाने रसिकांना हास्यरसात चिंब केले. परिस्थितीसापेक्ष विनोदाला रसिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एखाद्या बाबाच्या नादी लागून कुटुंबाला मनस्ताप होतो. यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने लोक मानसिक आणि आर्थिक त्रस्तता ओढवून घेत असतात. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खा. विजय दर्डा, डीआयजी योगेश देसाई आणि विभागीय आयुक्त अनुपकुमार प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला सुधादेवी लद्धड, नीलेश पनपालिया, सुनील लद्धड, उमेश लद्धड, सुभाष लाहोटी, महेश लाहोटी, मनोज सोनी उपस्थित होते. रोटरी इंटरनॅशनल संस्थेचे अध्यक्ष राहुल लद्धड यांनी स्वागतपर भाषण केले. संस्थेने मागील १५ वर्षात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय भविष्यात संस्थेने आखलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहितीही त्यांनी विस्ताराने दिली. रोटरी इंटरनॅशनल ही गैरसरकारी सामाजिक कार्य करणारी विश्वस्तरीय संस्था आहे. संस्थेच्यावतीने आयोजित या नाटकातून कौटुंबिक मनोरंजनासह समाजाला सार्थक संदेश देण्याचा प्रभावी प्रयत्न करण्यात आला. रोटरी इंटरनॅशनल नाटकातून मिळालेल्या निधीचा उपयोग महिला आणि मुलांसाठी हायजिन, हृदय शस्त्रक्रिया, स्क्वेंट सर्जरी आदींसाठी करणार आहे. रोटरीच्या या कार्याची यावेळी सर्व रसिकांनी प्रशंसा केली. (प्रतिनिधी)