शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:42 IST

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपरकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश ढवळून निघत असताना कोरोनापासून आपला बचाव करणे व अर्थव्यवस्था मजबूत करणे ही दोन्ही कामे एकत्रितपणे करण्यास प्राधान्य असले पाहिजे. सद्यस्थितीत देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू,तांदूळ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मौलिक वाटा असतो. त्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. सोबतच औद्योगिक पातळीवर चीनमधून बाहेर पडणाºया कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा सुरू होणार आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढा देत असताना लोकांमधील नैराश्य जाऊन आत्मविश्वास कायम राहावा यासाठी वृत्तपत्रांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.नागपुरात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होऊ शकतातनागपूर जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये सुधारणा करता येतील. संपूर्ण शहर बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रभाव शहरातील ज्या भागात अधिक आहे, तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतात. असे करत असताना सुरक्षा व नियमांचे पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. लवकरच पूर्ण स्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी