शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजप युती तुटावी अशी आमची इच्छाच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:31 IST

Nagpur News सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्दे बेईमानी केल्याने निसर्गानेच घेतला बदला

नागपूर : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप-शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या सदस्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोपाचा क्रम सुरू आहे. मात्र, दोन्ही पक्षांतील मतभेद मनभेदामध्ये परिवर्तित झाले असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे. सेना-भाजप युती तुटावी, अशी आमची इच्छाच नव्हती. जर दोन्ही पक्ष सोबत असते तर अनेक वर्षे सत्तेत राहिलो असतो, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान ते बोलत होते. युतीमध्ये निवडणुका लढविताना आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून यावेत यासाठी तासनतास बसून चर्चा करीत राहायचो आणि शिवसेनेचे नेते निघून जायचे. देवेंद्र फडणवीसांचा चेहरा वापरून त्यांनी निवडणुका लढविल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. जेव्हा जेव्हा समाजात बेईमानी होते, तेव्हा निसर्गच बदला घेत असतो, शिंदे-फडणवीसांचे सरकार हे निसर्गिक सरकार आहे. यानंतर बावनकुळे म्हणाले, सहा महिन्यांत काय झाले, असे प्रश्न विचारले जातात. शेतकऱ्यांशी निगडित सर्वाधिक सकारात्मक निर्णय हे आमच्याच सरकारने घेतले.

महाविकास आघाडीच्या काळात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आढावा बैठकाच घेत नव्हते. शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून मिळत असलेली तोकडी मदत हे महाविकास आघाडी सरकारचेच पाप आहे, असा आरोप त्यांनी केला.

ते फेसबुक लाइव्हच करत राहिले

कोकणासाठी निर्णय घ्यायची वेळ होती तेव्हा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले नाहीत. कोकण उद्ध्वस्त होत असताना माजी मुख्यमंत्री केवळ फेसबुक लाइव्ह करीत राहिले व १८ महिने मंत्रालयात आले नाहीत, आता शिंदे-फडणवीस १८-१८ तास काम करीत आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

बारामतीत एकदाच गेलाे, पवारांना इतके काय लागले ?

अजितदादांनी तुमचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिलाय, असा उल्लेख राष्ट्रवादीचे सदस्य शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केला. यावर मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तर बारामतीच्या दौऱ्यात मी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार असे बोलू का? माझी भूमिका आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठीच असेल हे स्पष्ट आहे. मी एकदाच बारामतीत गेलो आणि पवारांना त्याचे नेमके इतके काय लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन