शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही आहोतच, तुम्हीही सतर्क राहा

By admin | Updated: August 26, 2014 01:00 IST

पोलीस सोबतीला आहेतच, मात्र तुम्हीसुद्धा सतर्क राहा. भक्ती आणि श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आज पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त : गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना सादनागपूर : पोलीस सोबतीला आहेतच, मात्र तुम्हीसुद्धा सतर्क राहा. भक्ती आणि श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन आज पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले. विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी आज उपराजधानीतील गणेशोत्सव आणि पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी जाणून घेतली. या पार्श्वभूमीवर, गणेशपेठेतील हॉटेल रजवाडा पॅलेसमध्ये आज आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदा धिकाऱ्यांची, शांतता समितीची बैठक घेतली. बैठकीला बहुतांश गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच सहआयुक्त अनुपकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे, डीसीपी अभिनाश कुमार, श्रीप्रकाश वाघमारे, निर्मला देवी आणि ईशू सिंधू प्रामुख्याने हजर होते. ध्वनिक्षेपणाचा वापर रीतसर परवानगी घेतल्यानंतरच करावा. मंडळाने मंडप व स्टेज रस्त्यावर उभारू नये. रहदारीस अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यावर गणेशोत्सवाचे कार्यक्रम घेऊ नये, गणेशोत्सवादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी. कुणाच्याही भावना दुखावणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे आवाहन यावेळी अधिकाऱ्यांनी केले. आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण पोलीस आयुक्तालयातर्फे गेल्यावर्षी आयोजित आदर्श गणेश उत्सव स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरणही आज जाहीर करण्यात आले. स्पर्धेत प्रथम पुरस्कार - संती गणेशोत्सव मंडळ, सेंट्रल एव्हेन्यू, तहसील, द्वितीय पुरस्कार - श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कर्मवीर बुक डेपो मागे कोतवाली, तृतीय पुरस्कार - श्री गणेश उत्सव मंडळ बेलीशॉप क्वॉर्टर पाचपावली यांना मिळाली. प्रोत्साहन पुरस्कारांचे मानकरी रेल्वे सुरक्षा बाल गणेश उत्सव मंडळ, अजनी रेल्वे कॉलनी, संकटमोचन गणेश मंडळ, ठाकरे ले-आऊट गिट्टीखदान तसेच बाल हिंद समाज गणेश उत्सव मंडळ हनुमान गल्ली सीताबर्डी ही गणेशोत्सव मंडळे ठरली. या कार्यक्रमाचे संचालन अनुजा घाडगे यांनी तर आभारप्रदर्शन गणेशपेठचे ठाणेदार सुधीर नंदनवार यांनी केले. (प्रतिनिधी)