शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

हम हैं ना..

By admin | Updated: January 18, 2015 00:53 IST

बालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी

सोनी टीव्हीच्या कलावंतांचा लोकमत सखी मंचच्या सदस्यांशी संवादविहंग सालगट - नागपूरबालिका वधू मालिकेतून स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या प्रत्युशा बॅनर्जी आणि टीव्ही कलावंत दीप ढल्लन यांचा पुत्र कंवर ढिल्लन सोनी वाहिनीवरील ‘हम है ना..’ मालिकेच्या प्रमोशनसाठी लोकमत सखी मंचच्या संक्रांती मेळाव्यात आले. याप्रसंगी त्यांनी सखींशी संवाद साधला आणि आपले अनुभव सांगितले. याप्रसंगी त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा काही अंश वाचकांसाठी बालिका वधूने मिळाली ओळख बालिका वधू, झलक दिखला जा, बिग बॉस आणि नंतर सावधान इंडिया या मालिकेत प्रत्युशाने भूमिका केल्या आहेत. पण बालिका वधू या मालिकेतूनच माझी ओळख निर्माण झाली, असे प्रत्युशाने सांगितले. त्यामुळे ही भूमिकाच मला जास्त आवडते. यातील आनंदीची भूमिका माझ्या कायम स्मरणात राहील. प्रत्येक मालिकेचा अनुभव वेगवेगळा असतो. बिग बॉस मध्ये काम करताना बरेच शिकायला मिळाले. झलक दिखला जाटचा अनुभव वेगळा आहे. येथे वेगवेगळे नृत्य प्रकार शिकता आले. मी जरा नाजूक असल्याने बरेचदा नृत्य करताना जखमही झाली. बालिका वधू आणि झलक दिखला जा एकाचवेळी करीत होती त्यावेळी मला डेंग्यू झाला होता. त्यात वेळ काढणे माझ्यासाठी कठीण होते पण मला ते करता आले. सावधान इंडियात निवेदन करताना अनेक सत्य घटना समजून घेता आल्या. बालिका वधूला रिप्लेस केले तेव्हा माझ्या मनात जरा भीती होतीच पण लोकांनी मला स्वीकारले. ‘हम है ना..’ मालिका माझ्यासाठी लहान मुलीसारखी आहे. ही कथा बनारसला घडणारी आहे. ही मालिका लोकांना नक्की आवडेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. मी मुळात जमशेदपूरची राहणारी आहे. दहावीत असताना मुंबईत जाऊन अभिनय करण्याची इच्छा झाली. पण पालकांनी मला कोलकात्याला जाण्यास सांगितले. कोलकात्यात माझे मन रमले नाही आणि मी मुंबईत आले. त्यावेळी माझे वयही कमी होते. त्यावेळी आई म्हणाली, सर्वांच्या विरोधात तू मुंबईत जात आहेस तर काहीतरी बनून दाखव. आता तोच प्रवास सुरू आहे, असे प्रत्युशाने सांगितले. सिनेमात काम करण्याचे माझे स्वप्न : कंवर ढिल्लन‘हम है ना..’ची कथा बनारस येथे घडणारी आहे. यातला बंटी हा सर्वांचाच आवडता आणि गरीब कुटुंबातला आहे. एक बंगाली मुलगी लंडनमधून बनारसला येते आणि बंटीशी तिची भेट होते. दोघांमध्ये प्रेम निर्माण होते. पण बंटीची आई तिला स्वीकारत नाही. आई, चांगला पती आणि मुलगा यांच्या संघर्षाची ही कथा आहे, असे कंवर म्हणाला. मुंबईत मी पदवीचे शिक्षण घेत असताना प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचाच माझा विचार होता. पण संधी आपली वाट पाहात नाही. वयाच्या १८ व्या वर्षीच एका मालिकेसाठी आमंत्रण आले आणि मालिकेत काम करताना मी अभ्यासही सुरु ठेवला. माझा भाऊ कॅनडात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तो आता परत येणार आहे. पण मुंबई सोडून जाण्याची माझी इच्छा नाही कारण येथेच मला माझे भविष्य दिसते आहे. वडिलांनी प्रथम शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला होता त्यानंतर काय वाट्टेल ते कर, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता मला जे करायचे ते करणार आहे. घरातून मला प्रत्येक बाबीसाठी प्रोत्साहनच मिळाले. आता काही मालिकांमध्ये काम करतो आहे पण भविष्यात मला सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. मी स्पष्टवक्ता आहे त्यामुळे बरेचदा लोक दुखावले जातात पण बेगडी जगणे मला आवडत नाही.