शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

  ‘आम्ही कटिबध्द’ मोहिमेचा नागपूर जिल्ह्यात जागर

By गणेश हुड | Updated: May 24, 2023 18:37 IST

Nagpur News स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे.

गणेश हूड                                                                                                                                                                                           नागपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत २८ मे हा दिवस जागतीक मासिक पाळी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने ‘आम्ही कटिबध्द’ ही संकल्पना घेऊन जिल्हयात २२ ते २८ मे दरम्यान विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर सुरू आहे. या सप्ताहात मासिक पाळीतील गैसमजांबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत महिला, मुली, किशोर वयीन मुली यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी या सप्ताह कालावधीत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, आरोग्य् विभाग, शिक्षण विभाग, महिला व बाल कल्याण विभाग, तसेच उमेद मधील महिला बचत गटांच्या सहकार्याने गट विकास अधिकारी यांनी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.गाव पातळीवर, तालुकास्तरावर आशा, अंगणवाडी सेविका, महिला शिक्षीका, बचत गटांच्या महिला, डॉक्टर्स यांच्या सहकार्याने किशोर वयींन मुलींचे चर्चासत्र, त्यांचे प्रशिक्षण ,प्रात्याक्षिके, प्रसार माध्यमात लेखन करणे, निबंध स्पर्धा घेणे, पत्र लेखन करणे तसेच समाज माध्मांचा वापर करुन महिला, मुली यांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

लोकशिक्षणातून स्वच्छतेचे महत्व पटवून द्या-शर्मा

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी व स्वच्छतेविषयी ग्रामिण भागात महिलांमध्ये गैरसमज आहेत. मासिक पाळी दरम्यान किशोरवयीन मुली व महिलांमध्ये स्वच्छता व आरोग्याचे महत्व पटवून देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेवून लोकशिक्षणातून वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी केले आहे.

टॅग्स :Governmentसरकार