शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वाझे यांच्यासाठी हटवण्यात आले होते वरिष्ठ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:09 IST

जगदीश जोशी नागपूर : अँटिलिया प्रकरणात अटक एपीआय सचिन वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यात आल्यापासूनच मुंबई गुन्हे शाखेत असंतोष ...

जगदीश जोशी

नागपूर : अँटिलिया प्रकरणात अटक एपीआय सचिन वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यात आल्यापासूनच मुंबई गुन्हे शाखेत असंतोष होता. वाझे यांना सीआययू प्रभारी करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाजूला करण्यात आले होते. सीआययूच्या इतिहासात पहिल्यांदाच एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रभारी करण्यात आले होते. त्यामुळे नाराज अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही वाझे यांना कायम ठेवण्यात आले होते.

ख्वाजा युनुस प्रकरणात निलंबित वाझे यांना पोलीस सेवेत परत घेण्यात आल्यानंतर ९ जून २०२० रोजी गुन्हे शाखेच्या सीआययूमध्ये प्रभारी करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, वाझे यांच्या नियुक्तीपूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी सीआययूमध्ये होते. वाझे यांचा रस्ता मोकळा करण्यासाठी सुरुवातीला त्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना हटवण्यात आले. निलंबित अधिकाऱ्याला सेवेत परत घेतल्यानंतर सुरुवातीला कंट्रोल रूम, एसबी अशा ठिकाणी नियुक्ती दिली जाते. सीआययू गुन्हे शाखेचा सर्वात महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाला गोपनीय कारवाई किंवा अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारीच सोपवली जाते. मुंबई गुन्हे शाखेने या आधारावरच अनेक उपलब्धी मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत वाझे यांना सीआययू येथे नियुक्ती दिल्यामुळे गुन्हे शाखेत असंतोष पसरला होता. यासंदर्भात तक्रारी करणाऱ्यांना गप्प करण्यात आले होते. वाझे यांनी सीआययूमध्ये येताच संशास्पदरीत्या कार्य करायला सुरुवात केली. परिणामी, काही अधिकाऱ्यांनी बेनामी तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाझे यांच्यापासून सावधान राहण्यास सांगितले. त्यानंतर वाझे यांची नियुक्ती योग्य असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. वाझे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत फटकून वागत होते. तसेच, थेट पोलीस आयुक्तांना संपर्क करीत होते. त्यामुळे संपूर्ण गुन्हे शाखेने त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते.