शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

‘मेट्रोरिजन’साठी वेणाचे पाणी

By admin | Updated: July 5, 2015 02:59 IST

कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची ...

नागपूर : कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या नऊ टीएमसी पाण्यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची योजना जलसंपदा विभागाने प्रस्तावित केली आहे. हे पाणी जीवनी खापा येथील प्रस्तावित उर्ध्व प्रकल्पात सोडण्यात येईल. येथून ते पाईपलाईनव्दारे अमरावती मार्गावरील वेणा जलाशयात आणले जाणार आहे. यासाठी या प्रकल्पाची उंची वाढवावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन असून ८ जुलैच्या स्थायी समितीच्या बैठकीत तो मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.मनपाला या सर्वेक्षणावर ७४ लाखांचा खर्च करावा लागणार आहे. ६ जून २०१२ च्या स्थायी समितीच्या बैठकीत जीवनी खापा प्रकल्पात नागपूर शहर व मेट्रोरिजनसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पाव्दारे दररोज ७०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु यासाठी वेणा जलाशयाच्या पाणीसाठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी या प्रकल्याची उंची वाढविण्याची गरज आहे. हा प्रस्ताव तयार करताना प्र्रकल्पाचा सर्वे करण्याची गरज आहे. प्रकल्पावर होणाऱ्या खर्चाला मनपाची मंजुरी घेतल्यानंतर सिंचन व जलविद्युत प्रकल्प अन्वेषण विभागातर्फे हा खर्च केला जाणार आहे.वेणा प्रकल्पातील जलसंचय वाढल्याने बुडित क्षेत्रात वाढ होणार आहे. बुडित क्षेत्राच्या सर्वेसाठी ९ लाख, खड्डे व छिद्र, माती परीक्षण यावर ४० लाख, मध्यप्रदेशची सीमा ते वेणा प्रकल्पापर्यत पाणी आणण्यासाठीच्या सर्वेवर १८ लाख तसेच इतर कामावर ७ लाखाचा खर्च होण्याचा अंदाज आहे. सर्वे नंतर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.(प्रतिनिधी)अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजावे लागणारशहरातील दहनघाटावर अंतिम संस्कारासाठी लाकडाचा मोफत पुरवठा करून मनपाने आदर्श निर्माण केला होता. यामुळे गरीब लोकांना दिलासा मिळत होता. परंतु आता दहनघाटावर अंत्यसंस्कारासाठी पैसे मोजवे लागणार आहे. दारिद्र्यरेषेखालील लोकांना ५०० रुपये भरावे लागतील. परंतु यासाठी त्यांना नगरसेवकाचे पत्र आणावे लागेल. इतरांना अंतिम संस्कारासाठी निविदा दरानुसार लाकडासाठी पैसे मोजावे लागणार आहे. डिझेल, गॅसचा वापर केल्यास २०० रुपये द्यावे लागणार आहे. जुन्या कंत्राटदाराचा करार संपला असल्याने पुढील दोन वर्षासाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. दहनघाटावर वर्षाला ५४०० टन लाकडाची गरज भासते. यावर ३.०५ कोटी खर्च होतो. एका अंतिम संस्कारासाठी ३०० किलो लाकूड व १० किलो गोवऱ्या लागतात. दहनघाटाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे.