शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पुस्तकाविरोधात गुरुभक्तांमध्ये संतापाची लाट

By admin | Updated: August 24, 2016 03:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित

भावना दुखावणाऱ्या पुस्तकावर बंदीची मागणी : नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदननागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेवर अतिशय आक्षेपार्ह भाषेत वर्णन करणाऱ्या संबंधित पुस्तकामुळे समस्त गुरुदेव भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पंढरपूरचे ह.भ.प. महाराज वक्ते यांनी लिहिलेल्या ‘संत तुकाराम महाराज-सदेह वैकुंठागमन’ या पुस्तकावर संपूर्ण बंदी लावण्याची मागणी गुरुदेवभक्तांनी केली आहे. यासाठी श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूरतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना निवेदन सादर करण्यात आले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेल्या समाजप्रबोधनाच्या कार्याला कशाचीही तोड नाही. राष्ट्रसंतांनी रचलेल्या ग्रामगीता या ग्रंथामध्ये ग्रामविकासाच्या माध्यमातून राष्ट्राच्या विकासाचे स्रोत सांगितले आहेत. धार्मिकतेचे अवडंबर करण्यापेक्षा मानव समाजाच्या कल्याणाचा मार्ग त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून जनतेला सांगितला आहे. घराघरामध्ये ग्रामगीता एक आदर्श ग्रंथ म्हणून वाचली जाते. राष्ट्रसंतांच्या विचारांना मानणारा पुरोगामी विचारांचा समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. या महापुरुषाच्या महान ग्रंथाबाबत अत्यंत विकृतपणे ‘...सदेह वैकुंठगमन’ या पुस्तकात वर्णन केले आहे. एखादा विकृत माणूसच अशा प्रकारचे वर्णन करू शकतो, अशी टीका श्री गुरुदेव सेवाश्रमाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी केली. महाराज वक्तेच्या पुस्तकामध्ये राष्ट्रसंताबाबतही खोटे आरोप केले गेले आहेत. लेखकाने भारतीय संविधानाचा सुद्धा अर्वाच्च भाषेत अपमान केला आहे. वास्तविक राष्ट्रसंतांनी कधीही धार्मिक अवडंबराला थारा दिला नाही. त्यांची शिकवण समानतेची होती. कदाचित हीच बाब धर्मांधाना खटकत असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. राष्ट्रसंतांना मानणाऱ्या लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे, दोन संप्रदायांमध्ये भांडणे लावणे आणि राष्ट्रसंतांचे विचार समाजामधून हद्दपार करण्याचे धर्मांधाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप रक्षक यांनी केला. विकृत मनोवृत्तीच्या लेखकाने धर्मांधतेची गरळ ओकल्याची टीका त्यांनी केली.मंगळवारी असंख्य गुरुभक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वक्तेंच्या पुस्तकावर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली. विविध सामाजिक संघटनांचा यात सहभाग होता. जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुभक्तांचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे यावेळी आश्वासन दिले. या प्रतिनिधी मंडळामध्ये अ‍ॅड. अशोक यावले, रुपराव वाघ, प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी, अ‍ॅड. कृ पाल भोयर, रवी मानव, खडतकर, मोहनदास चोरे, बालू शिंदे, सचिन काळे, अंकित राऊत, गोपाळराव सिंगूरकर, देवीदास लाखे, डॉ. गोपाल हजारे, सुभाष बांगडे, दशरथ कोठे, भाऊराव तायवाडे, सुशीला लाडसे, ज्योती निचड, बाबाराव पाटील, गंगाध्रा घोडमारे, मयूर पाटणे, राकेश गिरी, नितीन सूर्यवंशी, नीळकंठ कळंबे आदी सहभागी झाले. (प्रतिनिधी)