शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जलकर भरणाऱ्यांनाही सवलत!

By admin | Updated: June 23, 2016 02:15 IST

पाणीबिल (जलकर) थकविणाऱ्यांना सवलत देण्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता महापालिका खडबडून जागी

नागपूर : पाणीबिल (जलकर) थकविणाऱ्यांना सवलत देण्यावर टीकेची झोड उठल्यानंतर आता महापालिका खडबडून जागी झाली आहे. आता नियमित पाणीबिल भरणाऱ्यांनाही सवलत देण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे. परंतु यासाठीच्या प्रारूपावर एकमत न झाल्यामुळे यावर अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी जलप्रदाय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या समितीत जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, ओसीडब्ल्यूचे अजीजूर रहमान, धंतोली झोनचे तारे व धरमपेठ झोनचे आगरकर यांचा समावेश करण्यात आला आहे. नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या उपभोक्त्यांना सूट देण्याबाबचे प्रारूप तयार करून ही समिती २७ जूनला या बाबतचा प्रस्ताव सादर करणार आहेत. पाणीपट्टी थकबाकीदारांना थकबाकीत ५० टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याची अंमलबजावणी करीत बड्या थकबाकीदांरा लाखोंची सवलत देण्यात आली. लोकमतने या विषयाकडे लक्ष वेधत कर भरणाऱ्यांना सवलत का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. नियमित बील भरणाऱ्यांना नागरिकांसह विरोधकांनी लोकमतच्या भूमिकेचे समर्थन करीत नियमित बील भरणाऱ्यांना सलवत देण्याची मागणी केली. सोमवारी महापालिकेच्या सभेतही या विषयाचे पडसाद उमटल होते. या पार्श्वभूमीवर जलप्रदाय समितीचे सभापती संदीप जोशी यांनी नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना सूट देण्याबाबतच्या प्रस्तावावर अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. जलप्रदाय विभागाला पाणीपट्टीच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ११० कोटींचे उत्पन्न मिळते. नियमित पाणीपट्टी भणाऱ्यांना १० टक्के सूट द्यावयाची झाल्यास ११ कोटींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे सूट देण्याच्या प्रारूपावर बैठकीत एकमत झाले नाही. त्यामुळे जोशी यांनी अभ्यास करण्यासाठी चार सदस्यीय समिती गठित करण्याचे निर्देश दिले.नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना सूट द्यावयाची झाल्यास यासाठी महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या अधिनियमात बदल करावा लागेल. या संदर्भात महापौर प्रवीण दटके यांच्यासोबत चर्चा करून जुलैच्या पहिल्या आठवड्यात विशेष सभा आयोजित करून यात अधिनियमात बदल करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतरच उपभोक्त्यांना याचा लाभ मिळणार आहे.(प्रतिनिधी)लोकमतच्या लढ्याला यशपाणीपट्टी थकबाकीधारकांना ५० टक्के सूट जाहीर करताना नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांवर अन्याय होत असल्याने त्यांनाही पाणीपट्टीत सूट मिळावी, अशी भूमिका लोकमतने मांडली. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रियेसह या संबंधिचे वृत्त प्रकाशित केले. यामुळे महापालिकेवर दबाव निर्माण झाला. याची दखल घेत जलप्रदाय समितीने नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना सूट देण्याचा प्रस्ताव आणला. यामुळे नियमित पाणीबील भरणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.