शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा वाढला पण वसुली केव्हा वाढणार!

By admin | Updated: August 31, 2015 02:47 IST

शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते.

महापालिका : सात लाख लोकांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणानागपूर : शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते. असे असूनही शहरातील सात लाख लोकांना पूर्वीच्या तुलनेत आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीने केला आहे. शहरातील शंभराहून अधिक वस्त्यांना काही वर्षांपूर्वी दिवसाआड पाणी मिळत होते. आता या वस्त्यांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. परंतु वसुलीचा विचार करता पाणीकरापासून १२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना मनपाला यापासून वर्षाला ९० कोटी मिळत आहे. पाणी बिलाच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यात ५० हजार अवैध नळजोडण्या नियमित के ल्या जाणार आहेत. यासाठी जुलै महिन्यात मोहीम राबविण्यात आली. परंतु याला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ओसीडब्ल्यूने तीन वर्षांपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी पाण्याची गुणवत्ता ७९ टक्के होती. आता ती ९५ टक्क्यांवर गेली आहे. पाण्याची गळती रोखण्यात यश आल्याचा दावा ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा यांनी केला आहे. गळती कमी झाल्यानेच पाण्याची गुणवत्ता वाढली आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत त्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)