शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरांनी मुख्य पाईपलाईनच फोडली

By admin | Updated: January 23, 2017 02:16 IST

पाणीचोरांनी अवैध कनेक्शन जोडताना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईनच फोडली.

हंसापुरीतील घटना : मोठा अनर्थ टळला नागपूर : पाणीचोरांनी अवैध कनेक्शन जोडताना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईनच फोडली. ही घटना रविवारी दुपारी हंसापुरी येथे घडली. मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याचा फवारा विजेच्या तारांवर जात असल्याने लोकांमध्ये भीती पसरली. हंसापुरी खदान येथे पाण्याची टाकी आहे. यात पाणीपुरवठा करणाऱ्या ३६ इंचाच्या मुख्य पाईपलाईनवर परिसरातील अनेक लोकांनी लपून कनेक्शन घेतले आहे. अनेक दिवसांपासून ही चोरी सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून १५ ते २० नवीन पाईपलाईन टाकून ती मुख्य लाईनशी जोडण्याचे काम सुरू होते. मुख्य पाईपलाईन ही रस्त्यावरून चार फूट खोल आहे. अवैध कनेक्शन असल्याने पाणीचोर ती लाईन मुख्य लाईनशी जोडण्याची प्रतीक्षा करीत होते. रविवारी मनपा व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुटी होती. रस्त्यावर अधिक गर्दी नसल्याने पाणीचोरांनी सकाळच्या वेळी प्लंबरच्या मदतीने काम सुरू केले. कनेक्शन जोडण्याच्या प्रयत्नात मुख्य लाईन फुटली. यामुळे पाण्याचा फवारा २५ ते ३० फूट उंच विजेच्या तारांवर पडू लागला. यामुळे अवैध कनेक्शन जोडणारे घाबरले व प्लंबरसोबत पळाले. दरम्यान, परिसरातील नागरिक घटनास्थळी एकत्र आले. अनर्थ होण्याच्या शक्यतेने त्यांनी लगेच मनपा व ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. परिसरातील नागरिकांनीच प्रयत्न करून पाण्याचा फवारा बंद केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. परिसरातीलच एक स्थानिक नेता पाणीचोरांचा प्रमुख असल्याचे सांगितले जाते. तो पैसे घेऊन अवैध कनेक्शन जोडून देतो. या घटनेमुळे एक मोठा अनर्थ टळला. नागरिकांनुसार यात नेते व अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयास्पद आहे. अनेकदा अवैध कनेक्शनबाबत तक्रारी करण्यात आल्या, परंतु काहीही कारवाई झाली नाही.(प्रतिनिधी) गुन्हा दाखल होणार यासंदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी राजेश कालरा यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. मनपा आयुक्तांचीही मदत मागण्यात आली आहे. अवैध कनेक्शन घेणाऱ्यांचा पत्ता लावला जात आहे. प्लंबरलाही शोधले जात आहे.