शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘ट्रायल’विना निवडली ‘वॉटर पोलो’ चमू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:00 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ‘वॉटर पोलो’ चमूच्या निवड प्रक्रियेच्या मुद्यावरून जोरदार गोंधळ झाला.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ अधिसभेत सदस्यांची आक्रमक भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत ‘वॉटर पोलो’ चमूच्या निवड प्रक्रियेच्या मुद्यावरून जोरदार गोंधळ झाला. सदस्यांनी कुलगुरूंवर अक्षरश: प्रश्नांचा वर्षावच केला. कुलगुरूंनी कुठल्या अधिकारात ‘ट्रायल’ न घेताच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होण्याची १३ सदस्यीय संघाला परवानगी कशी काय दिली व ‘ट्रायल’ दिलेल्या तीन खेळाडूंना कोणत्या आधारावर चमूत सहभागी करण्यास नकार देण्यात आला, असा प्रश्नदेखील उपस्थित केला.या मुद्यावर सभागृहाचे वातावरण तापले होते. चमूतील खेळाडूंचे हित लक्षात घेता विशेषाधिकारांतर्गत १३ सदस्यीय चमूला मंजुरी दिली. या खेळाबाबत मला काहीही माहिती नाही. खेळाडूंचे एक प्रतिनिधीमंडळ भेटले होते. त्यांचे म्हणणे होते की, विद्यापीठाच्या ‘वॉटर पोलो’च्या निवड समितीने खेळ न पाहताच संपूर्ण चमूला नाकारले; सोबतच राष्ट्रीय स्पर्धेत चमूला पाठविण्यास नकार दिला. हीच चमू मागील वर्षी चंदीगड येथे आयोजित ‘वॉटर पोलो’स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचली होती, अशी भूमिका खेळाडूंनी मांडल्याचे कुलगुरूंनी सांगितले. यासंबंधात विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. कल्पना वसंत जाधव यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. समितीने २६ खेळाडूंची ‘ट्रायल’ घेतली होती. यातील एकही खेळाडू योग्य नसल्याचा निर्वाळा समितीने दिला असल्याची बाब यानंतर समोर आली. डॉ. जाधव यांच्याकडून माहिती मिळताच १३ सदस्यीय चमूला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले.संबंधित चमूची ‘फिटनेस टेस्ट’ घेण्यात आली होती का आणि जर खेळाडूंना काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी उपस्थित केले.

चमूत समाविष्ट होणार ‘ते’ तीन खेळाडू‘ट्रायल’दरम्यान तीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांना जाणूनबुजून चमूमध्ये सहभागी करण्यात आले नाही, असा खुलासादेखील अ‍ॅड. वाजपेयी यांनी केला. प्रदीर्घ चर्चेनंतर कुलगुरूंनी तीन खेळाडूंना चमूमध्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली. या खेळाडूंना त्वरित पाठविण्यात यावे, तसेच स्पर्धेच्या आयोजकांना खेळाडूंची सुधारित यादी पाठविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी संचालक डॉ. जाधव यांना दिले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ