शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या खर्चावर ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:14 IST

सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार बाजी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. विविध स्तरावर प्रचार-प्रसारासह मतदारांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडे द्यावा लागेल हिशेबसंनियंत्रणासाठी समन्वय अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार बाजी मारण्यासाठी कामाला लागले आहेत. विविध स्तरावर प्रचार-प्रसारासह मतदारांच्या भेटीगाठीही वाढल्या आहेत. तर दुसरीकडे उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोग लक्ष ठेवून आहे. या निवडणुकीत प्रत्येक उमेदवारासाठी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चाचे संनियंत्रण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याकडे उमेदवाराला आपल्या खर्चाचा हिशेब सादर करावयाचा आहे.निवडणूक म्हटली की खर्च आलाच. कित्येक उमेदवार निवडणुकीत पैसा खर्च करण्यात मागे-पुढे पाहत नाही. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही वेळोवेळी होत असतो. तो चुकीचाही नाही. पैशाचा गैरवापर टाळण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे. निवडणूक कामासाठी मोठी यंत्रणा राबवावी लागत असल्याने निवडणुकीवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सध्या खर्चासाठी आयोगाने जिल्हा प्रशासनला १६ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. टी.एन. शेषन मुख्य निवडणूक आयुक्त असताना त्यांनी उमेदवारांच्या वारेमाप खर्चावर नियंत्रण आणले होते. उमेदवारांना खर्चाचा, हिशेब देणे, उत्पन्नविषयक प्रमाणपत्र देणे सक्तीचे केले. सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला ७० लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रत्येक हालचाली व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये टिपल्या जाणार आहेत.

उमेदवारांचे शपथपत्र मतदान केंद्रांवर लागणारनिवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला शपथपत्र भरून द्यावयाचे आहे. त्यात शिक्षण, त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची नोंद, संपत्तीची माहिती असणारे शपथपत्र प्रत्येक मतदान केंद्रांवर लावण्यात येणार आहे. निवडणुकीत अधिक विश्वासार्हता आणि पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आपला प्रतिनिधी कसा आहे. आपण ज्यांना मतदान करणार आहोत, तो उमेदवार कसा आहे, हे मतदाराला कळावे, या उद्देशातून निवडणूक विभागाने हे पाऊल उचलले आहे.

२५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागणारलोकसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने प्रवर्गानुसार डिपॉझिटच्या रकमा जाहीर केल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला २५ हजार रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे. अनुसूिचत जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना १२,५०० रुपये डिपॉझिट भरावे लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक