शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा प्रकल्पांत प्रक्रिया केलेले सांडपाणी

By admin | Updated: April 13, 2017 03:05 IST

राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे.

ऊर्जामंत्र्यांची माहिती : राज्यात सर्व ठिकाणी करणार बंधनकारक नागपूर : राज्यातील सर्व विद्युत ऊर्जा प्रकल्पांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी वापरणे बंधनकारक होणार आहे. राज्यातील पाण्याचा अपव्यय टळावा व सांडपाण्याचा योग्य वापर व्हावा यासाठी राज्य शासनाकडून पावले उचलण्यात येत आहेत, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिली. ‘नीरी’ येथे आयोजित ‘विकसनशील देशांतील एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रणाली’ या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ते बोलत होते. ऊर्जा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: औष्णिक ऊर्जा प्रकल्पांत तर जास्त पाणी लागते. शेतीसाठी पुरविले जाणारे पाणी येथे जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र दुसरीकडे शहरांमध्ये लाखो लिटर सांडपाणी वाहून जाताना दिसून येते. या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा उपयोग ऊर्जा प्रकल्पांमध्ये होऊ शकतो, असे बावनकुळे यांनी सांगितले. पाण्याच्या कमतरतेचा फटका राज्यातील अनेक ऊर्जा प्रकल्पांना बसला आहे. बावनकुळेंच्या अभ्यासाने विदेशी संशोधक थक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीत चंद्रशेखर बावनकुळे व्यस्त असतानादेखील ते १० मिनिटांसाठी या कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र त्यांच्या रुचीचा विषय असल्यामुळे अर्ध्या तासाहून अधिक काळ त्यांनी आपले विचार मांडले. भाषणादरम्यान त्यांनी विविध आकडेवारी मांडली तसेच अनेक संकल्पनांवरदेखील भाष्य केले. नवीन प्रयोगाबाबतची त्यांची अभ्यासू वृत्ती व त्यांचे सखोल ज्ञान पाहून देशविदेशातील संशोधकदेखील थक्क झाले. कार्यक्रम झाल्यानंतरदेखील बावनकुळे यांच्या भाषणाबाबत संशोधकांमध्ये कौतुक ऐकायला मिळत होते.