शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

वासनकरने २५ हजार धनादेशांचे केले काय ?

By admin | Updated: August 9, 2014 02:25 IST

वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी बँकांमधून घेतलेल्या २५ हजार १०० धनादेशांचे काय झाले,...

नागपूर : वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी बँकांमधून घेतलेल्या २५ हजार १०० धनादेशांचे काय झाले, याबाबतच्या तपासासाठी सरकार पक्षाने केलेली आरोपींच्या दोन दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडची मागणी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. मुळे यांच्या न्यायालयाने नामंजूर केली. या आरोपींना २१ आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी रिमांड सुनावून त्यांची मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. प्रशांत वासनकर आणि अभिजित चौधरी यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपल्याने शुक्रवारी त्यांना दोन दिवसांच्या वाढीव पोलीस कोठडी रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयाला असे सांगण्यात आले की, वासनकरने इंडियन ओव्हरसिज बँकेतून १२ आॅक्टोबर २०१० ते १८ फेब्रुवारी २०१४ या काळात २४ हजार ९५० आणि धरमपेठ येथील दी श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बँकेतून १५० धनादेश प्राप्त केले होते. हे धनादेश गुंतवणूकदारांना त्यांच्या ठेवींचा परतावा देण्यासाठी वापरल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र हे धनादेश ठेवी परताव्यासाठी वापरल्याचे बँकांच्या खाते उताऱ्यात आढळून येत नाही. या धनादेशाद्वारे आरोपीने किती रोख रकमेची उलाढाल केली याबाबत सविस्तर तपास करणे आहे. आतापर्यंत ११९ गुंतवणूकदारांकडून तक्रारी नोंदवण्यात आलेल्या असून फसवणुकीची रक्कम २९ कोटी ३७ लाख ४४ हजार २७० रुपये एवढी झाली आहे. याबाबत आरोपींकडे सखोल तपास करून रोखीने स्वीकारलेल्या रकमा कोठे ठेवल्या याचा शोध घेऊन हस्तगत करणे आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०१३ या दरम्यान गुंतवणूकदारांनी आपल्या देय रकमा परत मागितल्या होत्या. त्यांना रकमा न देता अविनाश भुते, अनिल सावरकर यासारख्या खासगी व्यक्ती, कंपन्या, सहआरोपी, सहकारी बँका, खासगी अकादमी, मेडिकल ट्रस्ट यांना देऊन गुंतवणूकदारांच्या ठेवीचांच मोठा अपहार करण्यात आला. या सर्वांना या रकमा देण्याचा उद्देश काय याबाबत तपास करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांच्या माहितीनुसार सुजीत मुझुमदार तसेच इतरांचे कंपनी एजंट म्हणून नाव समोर येत आहे. आरोपी याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.वासनकर वेल्थ आणि वासनकर इन्व्हेस्टमेंट ही कंपनी २००८ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचा आधार घेऊन वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. अशक्य प्रकारच्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून या कंपन्यांच्या नावे मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या. या संपूर्ण रकमा जप्त करणे आहे, असेही सरकार पक्षाकडून न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील विश्वास देशमुख, पीडित गुंतवणूकदारांच्या वतीने अ‍ॅड. बी. एम. करडे, फिर्यादी पाठक यांच्यावतीने अ‍ॅड. गजेंद्र सावजी , आरोपींच्यावतीने अ‍ॅड. एम. बी. नायडू, अ‍ॅड. श्याम देवाणी, अ‍ॅड. प्रकाश नायडू न्यायालयात उपस्थित झाले होते. (प्रतिनिधी)