शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२०१९-२० मध्ये विद्यार्थ्यांच्या पोटात राक्षस शिरला होता का? खानावळीचा अतिरिक्त खर्च चक्क ४ कोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 12:05 IST

Nagpur News २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत २०१९-२० या वर्षात विद्यार्थ्यांच्या भोजनावर ४ कोटी रुपयांच्या जवळपास अतिरिक्त खर्च झाला आहे.

ठळक मुद्देसमाजकल्याणच्या वसतिगृहातील खानावळीला भ्रष्टाचाराची बुरशी?

मंगेश व्यवहारे

नागपूर : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पोटात २०१९-२० या वर्षात राक्षस शिरला होता का? असा सवाल उपलब्ध खानावळीच्या खर्चाच्या आकडेवारीवरून केला जात आहे. कारण २०१८-१९ या वर्षाच्या तुलनेत २०१९-२० या वर्षात विद्यार्थ्यांच्या भोजनावर ४ कोटी रुपयांच्या जवळपास अतिरिक्त खर्च झाला आहे.

नागपूर जिल्ह्यात समाजकल्याण विभागाचे २४ वसतिगृह आहेत. २०१८-१९ मध्ये या वसतिगृहात २९९० व २०१९-२० या वर्षातही २९९० विद्यार्थी वास्तव्यास होते; पण २०१८-१९ मध्ये खानावळीचा खर्च ५,९५,४५,६४१ रुपये दाखविला आहे व २०१९-२० मध्ये खानावळीचा खर्च ९,४१,६७,८५४ रुपये दाखविला आहे. या अतिरिक्त खर्चामुळे विभागाकडे बोट दाखविले जात आहे. समाजकल्याणच्या वसतिगृहाच्या खानावळीला भ्रष्टाचाराची बुरशी तर लागली नाही ना? असा सवाल विद्यार्थी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे ही माहिती विभागानेच माहितीच्या अधिकारात उपलब्ध करून दिली आहे.

ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेता यावे म्हणून सामाजिक न्याय विभागाद्वारे वसतिगृह उपलब्ध करून दिली जाते. वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी चहा, नाश्ता व दोन वेळच्या भोजनाची सोय केली जाते. त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वाहतूक भत्ता व वैद्यकीय सुविधादेखील पुरविल्या जातात. नागपूर जिल्ह्यातील समाजकल्याणच्या २४ वसतिगृहांमध्ये टायगर सावजी कॅटरस (जयताळा) संजय भोजनालय अ‍ॅण्ड लक्ष्मी सब्जी भंडार वर्धा, मे. आनंद एल टेंभुर्णे, (सिद्धार्थ नगर टेका) अनिल पी. अग्रवाल (बाजार लाइन, देवळी, गोंदिया) टायगर काटर्स (जयताळा) निसर्ग महिला बचत गट (नेताजी नगर, भरतवाडा) यांनी २०१८-१९ व २०१९-२० या कालावधीत विद्यार्थ्यांना भोजन उपलब्ध करून दिले होते. या दोन्ही वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रति विद्यार्थी थाळी दर सारखाच होता. तरीही अतिरिक्त ४ कोटी रुपयांचा खर्च कसा वाढला, ही गोम न समजणारी आहे.

 

- मिळालेल्या माहितीत विद्यार्थ्यांची संख्या सारखी, थाळीचे दरही सारखे असे असताना ४ कोटीच्या जवळपास अतिरिक्त खर्च वाढत असेल तर नक्कीच प्रश्नचिन्ह उपस्थित होणार. हा अतिरिक्त खर्च का वाढला, याची चौकशी व्हायला हवी.

-आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच.

टॅग्स :fraudधोकेबाजी