शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वॉरंट जारी तरीही तपास अधिकारी ‘नदारद’

By admin | Updated: August 30, 2014 02:48 IST

अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले.

नागपूर : अटकेचा वॉरंट जारी होऊनही तपास अधिकारी अखेरपर्यंत साक्ष देण्यास न्यायालयात अनुपस्थित राहिले. परिणामी जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनी हल्ल्यातील आरोपीची निर्दोष सुटका झाली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने दिला. पप्पी ऊर्फ बलराम गंगाप्रसाद अत्तरवेल (२६), असे आरोपीचे नाव असून तो बेझनबाग सुदर्शन कॉलनी येथील रहिवासी आहे. मनीष कचरू मेंढे (३८), खुनी हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. या प्रकरणातील फिर्यादी जखमीचा भाऊ शेखर कचरू मेंढे रा. इंदोरा भंडार मोहल्ला हा आहे. सरकार पक्षानुसार ‘मोबाईल’वरून २१ आॅक्टोबर २०१३ रोजी ही खुनी हल्ल्याची घटना घडली होती. मनीष हा घटनेच्या वेळी पेंटिंगची कामे करायचा. घटनेच्या दिवशी सकाळी तो आपला पुतण्या अक्षय याला सोबत घेऊन कामावर जात असताना त्यांना आरोपीने अडवले होते. काही दिवसांपूर्वी अक्षय याने पप्पीचा मोबाईल घेतला होता. परंतु तो त्याला परत करीत नव्हता. पप्पीने त्याला मोबाईल मागताच मनीष त्याला म्हणाला होता की, ‘अभी हम काम पर जा रहे है, बाद में देख लेना तेरा मोबाईल’ त्यामुळे पप्पी हा संतप्त होऊन मनीष आणि त्याच्यात बाचाबाची झाली होती. घटनेच्या दिवशी मनीष हा आपला भाऊ शेखर याच्या घरी आल्याचे समजताच पप्पीने शेखरच्या घरात घुसून धारदार व तीक्ष्ण चाकूने मनीषवर सहा घाव घालून गंभीररीत्या जखमी केले होते. शेखर मेंढे याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश खंडाते यांनी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. साक्षीपुराव्यादरम्यान तपास अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हते. आधी समन्स आणि अटकेचा वॉरंट जारी होऊनही ते न्यायालयात उपस्थित झालेच नाहीत. न्यायालयात अन्य साक्षीदारांच्या साक्षीत तफावती आल्या. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. पराग उके तर सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मिलिंद पिंपळगावकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)