शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ९३ शिक्षण संस्थांना स्कूलबस फिटनेसप्रकरणी वॉरंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 14:17 IST

स्कूल बसेसच्या फिटनेसप्रकरणी आदेश देऊनही हजर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९३ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांना जमानती वॉरंट जारी केला आहे.

ठळक मुद्दे१२ हजार स्कूल बसेसची तपासणी शिल्लकहायकोर्टाचा आदेश पाळला नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : स्कूल बसेसच्या फिटनेसप्रकरणी आदेश देऊनही हजर न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ९३ शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि प्राचार्य यांना जमानती वॉरंट जारी केला आहे.बारा हजार स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हायकोर्टाने १५ सप्टेंबर रोजी १२६ शाळांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड बसविला होता. हा दंड न भरणाºया शाळांच्या अध्यक्ष व प्राचार्य यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते. हायकोर्टाच्या आदेशानुसार १२६ पैकी केवळ काही शाळा हायकोर्टात हजर झाल्या, ही गंभीर बाब न्यायालय मित्र अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. ज्या शाळा हायकोर्टात आजतागायत हजर झाल्या नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करा आणि अशा गैरहजर असलेल्या शाळांची नावे द्या, असे आदेश हायकोर्टाने ४ आॅक्टोबर रोजी दिले होते. त्यानंतर १२६ पैकी ३३ शाळा हायकोर्टात हजर झाल्या होत्या. उर्वरित ९३ शाळांच्या अध्यक्ष व प्राचार्यांनी हायकोर्टाच्या आदेशाकडे कानाडोळा केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी बुधवारी ९३ अध्यक्ष व प्राचार्य यांच्याविरुद्ध २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्याचा जमानती वॉरंट जारी केला. या आदेशामुळे प्राचार्य व अध्यक्षांचे धाबे दणाणले आहे.दरम्यान शहरात २४ हजार स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली असून १२ हजार बसेसची तपासणी करण्यात आलेली नाही. शाळा आणि जिल्हा स्तरावर समिती तयार करण्यात आली आहे. यानंतरही बारा हजार बसेसची फिटनेस तपासणी करण्यात आली नाही. स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करा, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिले होते. या आदेशानंतरही स्कूल बसेसची तपासणी करण्यात आली नाही. त्यामुळे ज्या शाळांनी बसेसची फिटनेस तपासणी केली नाही, अशा १२६ शाळांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंड मागील सुनावणीत बसविण्यात आला. यापैकी काही शाळांनी दंड भरला ते आपल्या वकिलांसह हायकोर्टात हजर झाले होते. १२६ शाळांना प्रतिवादी करण्यात आले. त्यापैकी ३३ शाळा हायकोर्टात हजर झाल्या. ९३ शाळा या कायद्याच्या कचाट्यात सापडल्या आहेत.दरम्यान काही वर्षांपूर्वी वीरथ झाडे या शाळकरी विद्यार्थ्याचा स्कूल बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर लहान मुलांना शाळेत घेऊन जाणाऱ्या आणि घरी परत आणणाऱ्या स्कूल बस आणि आॅटोरिक्षांविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याप्रकरणी हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली होती.

टॅग्स :Courtन्यायालय