शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
2
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
3
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
4
Munbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय महिलेसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
5
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
6
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
7
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
8
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
9
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
10
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
11
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
12
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
13
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
14
६ हजार तपासणी मोहिमा, २ लाख प्रवाशांवर कारवाई; कोकण रेल्वेने वसूल केला १५ .२१ कोटींचा दंड
15
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
16
IPL 2026 : विराटच्या RCB वर बंगळुरुकरांना निरोप देण्याची वेळ; पुणेकर पाहुणचारासाठी नटले!
17
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
18
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
19
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
20
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?

आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्काराचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:49 IST

राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)ने दिला आहे.

ठळक मुद्दे मेस्टाच्या पदाधिकाऱ्यांचे जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राईट टु एज्युकेशन (आरटीई)ची शाळांना मिळणारी प्रतिपूर्ती गेल्या दोन वर्षापासून थकीत आहे. २०१८-१९ साठी शासनाने पुन्हा आरटीईची प्रक्रिया राबविली आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन (मेस्टा)ने दिला आहे. त्याचबरोबर सोमवारी मेस्टा अंतर्गत येणाऱ्या शाळांनी शासनाच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून काम केले. त्याचबरोबर मेस्टाच्या पदाधिकाऱ्यांनी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना सुद्धा आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. यासंदर्भात बोलताना मेस्टाचे अध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे म्हणाले की, बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे आम्ही शाळा बंद केल्या नाही. शासनाचा निषेध म्हणून काळी पट्टी लावून कामकाज सुरू ठेवले. पण शासनाने आरटीईची प्रतिपूर्ती पात्र शाळांना त्वरित करावी, मोफत प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्यात, आरटीईत नोंदणी करण्याचे अधिकार शाळांना देण्यात यावे, प्रथम मान्यता, आरटीई मान्यता व नैसर्गिक वाढ त्वरित देण्यात यावी तसेच आरटीई प्रतिपूर्तीचा दर वाढविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. निवेदन देताना मेस्टाचे विभागीय अध्यक्ष खेमराज कोंडे, कपिल उमाळे, मोहमद आबिद, नरेश भोयर आदी उपस्थित होते.