शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

गोदामात सडलेले धान्य रेशन दुकानात

By admin | Updated: September 20, 2015 03:10 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या ...

कमलेश वानखेडे नागपूरसार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत नागपूर शहरातील रेशन दुकानांमध्ये पावसामुळे सडलेले व दुर्गंधी येत असलेल्या धान्याचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अजबबंगलाजवळ असलेले शासकीय गोदाम पूर्णपणे भकास झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाने या गोदामाची देखभाल-दुरुस्ती केलेली नाही. गोदामाचे टिनचे शेड तुटले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी आत शिरून धान्याची पोती भिजत आहेत. परिणामी धान्याचा दुर्गंध येत आहे. अशा धान्याचा रेशन दुकानांमध्ये पुरवठा करून गरिबांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. अजबबंगलाजवळील हे गोदाम जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येते. अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याकडे गोदामाच्या देखभाल - दुरुस्तीची जबाबदारी आहे. तर येथे येणारे धान्य साठवणे, त्याची उचल करून रेशन दुकानदारांना पुरवठा करण्याचे काम नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत एफसीआयकडून पाठविण्यात आलेले गहू, तांदूळ, साखर, डाळ असे सुमारे दोन हजार मेट्रिक टन धान्य या गोदामातील पाचही ब्लॉकमध्ये साठवून ठेवले जाते. येथून नागपूर शहरातील रेशन दुकानांना धान्याचा पुरवठा केला जातो. दररोज माल येणे व नेणे सुरू असते. गोदामाची इमारत सुमारे ७० वर्षे जुनी आहे. या गोदामाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागाची आहे. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत या गोदामाची गेल्या काही वर्षांपासून देखभाल-दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे व कित्येक वर्षांपासून गोदामाला साधा चुनादेखील मारलेला नसल्याचे निदर्शनास आले. गोदामाची नियमित साफसफाईदेखील केली जात नाही. गोदामातील भिंतींना मोठमोठे जाळे लागल्याचे पाहायला मिळते. गोदामावर टिनाचे शेड असून काही ठिकाणी त्या टिनाला छिद्र पडले असल्यामुळे पावसाळ्यात पाणी गळते. भिंतींमधूनही पावसाचे पाणी झिरपते. गोदामाच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात ओल असल्याचे दिसून आले. पावसाचे पाणी गळल्यामुळे गोदामातील धान्य काही प्रमाणात सडले. या धान्याची दुर्गंधी येते. सडका वास येत असलेले हेच दुर्गंधीयुक्त धान्य रेशन दुकानदारांना पुरवठा केले जाते. या सडलेल्या धान्याचा येथे एवढा दुर्गंध येतो की गोदामात पाच मिनिट बसणेही कठीण होते. मात्र, येथे काम करणाऱ्या कामगारांना अशाही परिस्थितीत येथेच बसून जेवणाचा डबा खावा लागतो. गोदामाच्या बाहेर फ्लोरिंग केलेले नाही. त्यामुळे ट्रकमधून पोती काढून गोदामात ठेवताना धान्य खाली पडते, नंतर ते मातीमिश्रित धान्य उचलून पोत्यांमध्ये भरले जाते. पावसाळ्यात तर संपूर्ण चिखल असतो. त्यामुळे चिखलात सांडलेले धान्यही जमा करून नंतर पोत्यांमध्ये भरले जाते. बाहेरच्या व्हरांड्याची स्थिती तर आणखीनच वाईट आहे. गोदामात जागा नसल्यामुळे बाहेर व्हरांड्यातच वजनकाटा लावून धान्याचे वजन केले जाते. वजन सुरू असताना पाऊस आला तर व्हरांड्यात काढलेले सर्वच्यासर्व धान्य भिजते. त्यामुळे ते वाळवून पुन्हा पोत्यात भरून रेशन दुकानदारांकडे पाठविले जाते. येथील कामगारांनी तसेच वखार महामंडळानेही अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना वारंवार पत्र पाठवून गोदामाची दुरुस्ती करण्याची मागणी केली; मात्र त्याकडे अजिबात लक्ष दिले गेले नाही. गोदामात लाईटही नाहीगोदामात धान्याची पोती ठेवण्याचे व काढण्याचे काम सायंकाळी ६ वाजतापर्यंत केले जाते. मात्र एखाद्या वेळी माल घेऊन येणारा ट्रक उशिरा आला तर मात्र धान्याच्या पोत्यांची गोदामात थप्पी लावायला रात्र होते. अजबबंगला परिसरातील या पाचही गोदामात वीजपुरवठा नाही. त्यामुळे सायंकाळ होताच अंधार पसरतो. अशापरिस्थितीत येथे काम करणाऱ्या कामगारांना मेणबत्तीच्या प्रकाशात किंवा टॉर्च लावून तब्बल २० पोत्यांची उंच थप्पी मारावी लागते. कमी प्रकाशामुळे एखाद्या कामगाराचा पाय घसरला तर संपूर्ण पोती त्याच्या अंगावर पडून त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र असे असतानाही गेल्या १० वर्षांत गोदामात एक साधा लाईट लावण्याची तसदीही पुरवठा विभागाने घेतलेली नाही.