शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ओलांडली तर निवडणूक रद्दही होऊ शकते; निवडणुकांवरील टांगती तलवार कायम
2
नरिमन पाँईंटवरून थेट विरार...पोहचा एका तासातच सुसाट; उत्तन-विरार सागरी सेतूच्या ‘DPR’ला मान्यता
3
रेड झोन झाला तर बांधकामे बंद होणार; प्रदूषणाचा विळखा कायम, मुंबई महापालिकेचा इशारा
4
असत्यावर सत्य विजय मिळविते याचे भगवा ध्वज हे प्रतीक - पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
मुंबईत ४.३३ लाख दुबार मतदार, महापालिकेची कबुली; म्हणाले, नावे काढण्याचा अधिकार आम्हाला नाही
6
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
7
पतीकडून शारीरिक, मानसिक छळ; सेलिना जेटली हायकोर्टात, ५० कोटींची पोटगी हवी?
8
४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 
9
शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
10
वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 21:37 IST

जागतिक आणि स्थानिक व्यापार बाजारपेठेचे प्रवेशद्वार वर्धा (सिंदी रेल्वे) ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून एक महिन्यात बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्टचे उपाध्यक्ष आणि वर्धा ड्राय पोर्टचे अध्यक्ष (प्रभारी) नीरज बन्सल यांनी दिली.

ठळक मुद्देनीरज बन्सल यांची माहिती : एक महिन्यात निविदा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जागतिक आणि स्थानिक व्यापार बाजारपेठेचे प्रवेशद्वार वर्धा (सिंदी रेल्वे) ड्राय पोर्ट दोन वर्षांत कार्यान्वित होणार असून एक महिन्यात बांधकामाच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती जवाहरलाल नेहरू ट्रस्ट पोर्टचे उपाध्यक्ष आणि वर्धा ड्राय पोर्टचे अध्यक्ष (प्रभारी) नीरज बन्सल यांनी दिली.ड्राय पोर्ट पहिल्या १२४ एकरवर खासगी सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी ३५० एकर जागा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या जागेच्या सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे. प्रकल्पात सुमारे ५०० कोटींची गुंतवणूक व हजारापेक्षा जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे बन्सल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.रेल्वे, रस्ते जोडणी सुलभपहिल्या टप्प्यात ८२ एकर जागेसाठी निविदा काढण्यात येईल. ड्राय पोर्टमध्ये रेल्वे सायडिंगसह रस्ते जोडणी, कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, जीएसटी कार्यालय आणि सर्व पायाभूत सोयीसुविधा एकाच ठिकाणी राहणार आहे. या पोर्टमधून माल कंटेनरने जास्तीत जास्त आठ तासांत मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये (जेएनपीटी) जाईल, शिवाय भाडेही कमी लागेल. पोर्टवरून कंटेनरने मालाची निर्यात करण्यात येईल. बन्सल म्हणाले, विदर्भातील ९० टक्के कार्गो ‘जेएनपीटी’ला येतात. विदर्भात लॉजिस्टिकची भरपूर क्षमता आहे. ड्राय पोर्टमधून जेएनपीटीपर्यंत रेल्वे आणि रस्ते मार्गाने कृषी, स्टील आणि अन्य उत्पादने जातील. बन्सल म्हणाले, महाराष्ट्रात वर्धा, जालना, नाशिक आणि सांगली येथे ड्राय पोर्ट उभारण्यात येणार आहे. जालना आणि वर्धेसाठी डीपीआर तयार आहे आणि जमीन अधिग्रहित केली आहे. नाशिक आणि सांगली येथे अ‍ॅग्रो इंडस्ट्रीमुळे उभारण्यात येणाºया ड्राय पोर्टसाठी राज्य शासनाकडून जमीन मिळालेली नाही.भारतातून १४ दशलक्ष कंटेनरची निर्यातबन्सल म्हणाले, भारतातून दरवर्षी १४ दशलक्ष कंटेनरची निर्यात होते. चीनची आकडेवारी पाहिल्यास एकट्या सांघाई पोर्टवरून ३५ दशलक्ष कंटेरनची निर्यात होते. जगात वाहतूक भाडे ८ ते ९ टक्के आणि भारतात १२ टक्के आहे. किंमत कमी करण्यावर भर आहे. मध्य भारतात कंटेनर विकास ६ ते ७ टक्के आहे. मिहानमध्ये वेगळी सुविधा आहे. वर्धेतील ड्राय पोर्टमुळे तांदूळ निर्यातदार, कापड उद्योग आणि वस्त्र उद्योग, स्टील आणि खनिज व्यापारी, स्क्रॅप, प्लास्टिक आणि पेपर पल्प, इलेक्ट्रिकल यंत्रे, आॅटोमोटिव्ह पार्ट्स उत्पादनांमध्ये वाढ होऊन रोजगार तसेच औद्योगिकीकरण आणि विकासाला चालना मिळेल.

 

 

 

टॅग्स :Travelप्रवास