लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी आणि परिस्थितीवर नियंत्रणाच्या दृष्टीने महापालिका मुख्यालयात गेल्या आठवडाभरापूर्वी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. तबलिगी जमातच्या नागपूर कनेक्शननंतर निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता ‘कोरोना’शी आरपारची लडाई लढण्यासाठी या वॉर रूममध्ये रणनीती आखली जात आहे.महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या ‘वॉर रूम'मध्ये कोरोनासोबत लढण्याची रणनीती तयार केली जाते. नागपूर महापालिकेकडे कोरोना कंट्रोल रूम, कोविड-१९ मोबाईल अॅप, कंटेनमेंट सर्वेक्षण, हाय रिस्क नागरिकांचे सर्वेक्षण, ४८ रॅपिड रिस्पॉन्स टीम, राज्य शासन आणि केंद्र शासन आदींच्या माध्यमातून दररोज कोरोनासंदर्भात माहिती प्राप्त होते. मिळालेल्या माहितीवर काय कार्यवाही करायला हवी, काय कार्यवाही झाली आहे यावर तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत दररोज रात्री ९.३० वाजता चर्चा केली जाते. डॉक्टरांच्या चमूसोबत विचारविनिमय करून याच वॉर रूममध्ये रणनीती ठरविली जाते. गेल्या आठवडाभरापासून हे काम अविरत सुरू आहे.यासंदर्भात अधिक माहिती देताना तुकाराम मुंढे म्हणाले, कोरोनावर प्रतिबंध घालण्यासाठी महापालिका प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘वॉर रूम’ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.आरोग्य यंत्रणा सक्षम करणारमनपाची वॉर रूम केवळ कोरोनापुरतीच मर्यादित राहणार नाही, तर कोरोनाचे संकट गेल्यानंतरही भविष्यात मनपाची आरोग्य यंत्रणा अधिक सुदृढ आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने वॉर रूम कार्यरत राहणार आहे. ही वॉर रूम कायमस्वरूपी राहणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
नागपुरात कोरोनाशी लढण्यासाठी 'वॉर रूम' सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:24 IST
तबलिगी जमातच्या नागपूर कनेक्शननंतर निर्माण झालेले आव्हान लक्षात घेता ‘कोरोना’शी आरपारची लडाई लढण्यासाठी या वॉर रूममध्ये रणनीती आखली जात आहे.
नागपुरात कोरोनाशी लढण्यासाठी 'वॉर रूम' सज्ज
ठळक मुद्देमनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची संकल्पना : आरोग्य यंत्रणा सशक्त करण्याचा निर्धार