शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्ट बारमध्ये खुर्च्यांवरून ‘वॉर’

By admin | Updated: April 22, 2017 03:09 IST

हायकोर्ट बारमध्ये खुर्च्या वाटपावरून वादाचा भडका उडाला आहे. काही सदस्यांनी बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नसल्यामुळे,

वाटपावर आक्षेप : जुन्या कार्यकारिणीच्या निर्णयावर रोष नागपूर : हायकोर्ट बारमध्ये खुर्च्या वाटपावरून वादाचा भडका उडाला आहे. काही सदस्यांनी बसण्यासाठी खुर्च्या मिळाल्या नसल्यामुळे, काही सदस्यांनी खुर्च्या काढून घेण्यात आल्यामुळे तर, काही सदस्यांनी बसण्याची जागा बदलविण्यात आल्यामुळे विरोध नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी अनेकांनी हायकोर्ट बार असोसिएशनकडे लिखित आक्षेप कळविले आहेत. खुर्च्यांच्या व्यवस्थेसंदर्भात जुन्या कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे. हा निर्णय निवडणुकीनंतर घेण्यात आला. त्यामुळे निर्णय अवैध आहे, असे सदस्यांचे म्हणणे आहे. अ‍ॅड. उज्ज्वल फसाटे यांनी संघटनेला दिलेले निवेदन वृत्तपत्र प्रतिनिधींना मिळाले आहे. २०१५ मध्ये ५१ खुर्च्यांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. ३० हजार रुपये शुल्क घेऊन खुर्ची देण्यात येणार होती. त्यानुसार, फसाटे यांनी अर्ज व ३० हजार रुपयांचा धनादेश संघटनेकडे जमा केला. परंतु, तो धनादेश अद्याप वठविण्यात आला नाही. जुन्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपतपर्यंत खुर्च्या वाटपावर निर्णय घेतला नाही. कार्यकाळ संपल्यानंतर अवैधरीत्या खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. खुर्च्या वाटप करताना वरिष्ठता लक्षात घेण्यात आली नाही व निकषांचे पालन करण्यात आले नाही असे फसाटे यांनी सांगितले. नवीन कार्यकारिणी या वादावर कसा तोडगा काढते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी) सर्वांना जागा मिळेल उच्च न्यायालयात वकिलांना बसण्यासाठी पुरेसी जागा नाही. त्यामुळे अनेक वकील स्थायी जागा वाटप होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. नवीन इमारतीचे काम पूर्ण होतपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या जागेत सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. - अ‍ॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन.