शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग सहज चढतील इमारतीचे माळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 01:23 IST

शासकीय इमारतीच्या पायºया चढणे दिव्यांगांना त्रासदायक ठरत होते. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शहरातील ५० इमारतींमध्ये अपंगांना सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसुगम्य भारत अभियान : ५० इमारतीमध्ये उपलब्ध होणार सोईसुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय इमारतीच्या पायºया चढणे दिव्यांगांना त्रासदायक ठरत होते. यासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शहरातील ५० इमारतींमध्ये अपंगांना सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे. अपंग आयुक्तालयातर्फे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे. केंद्र सरकारच्या सुगम्य भारत अभियानांतर्गत या उपाययोजना करण्यात येणार आहे. नागपूर जि.प.चा समाजकल्याण विभाग या सोयीसुविधेवर नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवणार आहे.शासकीय कार्यालयाच्या पायºया चढणे, दिव्यांगासाठी खरोखरच त्रासदायक ठरते. दिव्यांगाच्या अडचणी लक्षात घेता, शहरातील इंद्रधनू या संस्थेने शासकीय कार्यालयात अपंगांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या सोयीसुविधा सुगम्य भारत अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. यात नागपूर शहरातील ५० इमारतींचा समावेश करण्यात आला आहे. इमारतींमध्ये दिव्यांगांना सहज कार्यालयात जाता येईल, यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यात दिव्यांगाचे वाहन सहज कार्यालयात पोहचेल, यासाठी रॅम्प, टॉयलेटला जाताना त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक सोयी-सुविधा, कार्यालयाच्या दरवाजांना हॅण्डल अशा काही सोयीसुविधा करण्यासाठी अपंग आयुक्तालयाच्या माध्यमातून निधी देण्यात आला.वर्षभराच्या आत त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, अशी माहिती जि.प. समाजकल्याण अधिकारी सुकेशिनी तेलगोटे यांनी दिली.आॅडिटनंतर झाला निर्णयदिव्यांगांना सुलभ भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने सुगम्य भारत अभियान राबविले आहेत. या अभियानांतर्गत इमारतीची निवड करण्यापूर्वी शहरातील संपूर्ण शासकीय इमारतीचे आॅडिट करण्यात आले होते. यात दिव्यांगांसाठी सहज कार्यालयात जाता येईल यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी उपलब्ध आहेत किंवा नाही याचा आढावा घेण्यात आला होता. या आॅडिटनंतर शहरातील ५० शासकीय इमारतीची निवड करण्यात आली. यात केंद्र आणि राज्याच्या शासकीय इमारतीचा समावेश आहे.