शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा

By admin | Updated: April 5, 2015 02:34 IST

उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे, उघड्या व्यक्तीला वस्त्र देण्यासारखे दुसरे पुण्य नाही.

नागपूर : उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे, उघड्या व्यक्तीला वस्त्र देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. त्यामुळे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या सदस्यांनी लोकांच्या गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवावा, असे आवाहन लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या आंतरराष्ट्रीय संचालक अरुणा ओसवाल यांनी केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या आठव्या प्रांतीय अधिवेशनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा प्रांतपाल नवीन पटेल, उपप्रांतपाल विजय पालीवाल, उपप्रांतपाल राजे मुधोजी भोसले, मीना पाटील, डी. जी. वांदिले, चेतन मारवाह, हरीश आकरे उपस्थित होते. अरुणा ओसवाल म्हणाल्या, सर्वांनी शक्ती दिल्यामुळे लॉयन्स क्लब इंटरनॅशनलची यशस्वी वाटचाल सुरू आहे. लॉयन्स क्लबमधील सदस्यांचे एकमेकांशी रक्ताचे नाते नसले तरी त्यांचे एक कुटुंब तयार झाले आहे. कुठल्याही देशात कोणतीही समस्या लॉयन्सच्या सदस्यांना आल्यास तेथील सदस्य धावून जातात. त्यामुळे सर्वांविषयी करुणा बाळगून लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. लक्ष्मीकांत राठी यांनी लॉयन्स क्लबचा कायदा आणि प्रक्रिया सादर केली. राजे मुधोजी भोसले यांनी आगामी वर्षात अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. विजय पालीवाल यांनी सदस्यता नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती दिली. नवीन पटेल यांनी मागील वर्षात ४ लाख ८० हजार नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी डी. जी. वांदिले, हरीश आकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांचा सत्कार करण्यात आला. लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे दिवंगत सदस्य बशीरुद्धीन खान, स्वाती भिसे, सत्वनसिंग बग्गा, प्रवीण वेल्दी, माधव अहिरकर, धन्नालाल जाजू, लालचंद त्रिकोटी, भागचंद बजाज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रेया खराबे हिने गीत सादर केले. संचालन डॉ. मनोज साल्पेकर यांनी केले. कार्यक्रमाला लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)