शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सी-प्लेनसाठी प्रतीक्षा

By admin | Updated: April 23, 2017 02:56 IST

नागपुरातून सी-प्लेनची सवारी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

मे मध्ये निघणार निविदा : पर्यटनाशी जोडून उत्पन्नाचे साधन बनविण्याचा विचार राजीव सिंह  नागपूर नागपुरातून सी-प्लेनची सवारी करणाऱ्याची इच्छा असणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. अंबाझरी-कोराडी- खिंडसी तलावादरम्यानच्या मार्गात अडचणी नाहीत. परंतु, नागपूर-आनंद सागर-शिर्डी मार्गावर सी-प्लेन उडविण्यात काही अडचणी येऊ शकतात. याशिवाय हा प्रकल्प तोट्यात जाऊ नये म्हणून सर्वच बाजू तपासून पाहिल्या जात आहे. विदर्भाचे पर्यटन व वन्य क्षेत्राला याच्याशी जोडून उत्पन्नाचे साधन बनविण्याचा विचार सुरू आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी), मुंबईच्या नियंत्रणाखाली हा प्रकल्प साकार होईल. या वर्षाच्या शेवटी किंवा पुढील वर्षीच सी-प्लेन उड्डाण भरण्याची शक्यता आहे. नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) ला अंबाझरी तलाव, कोराडी तलाव, इरइ डॅम, खिंडसी रामटेक येथे सी-प्लेन उतरविण्यात येणारी जागा, जल स्तर, पायाभूत सुविधा आदीच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सर्वेचे काम पूर्ण झाले आहे. मे शेवटपर्यंत निविदा काढल्या जातील. प्रक्रिया पूर्ण होण्यास आॅक्टोबर २०१७ पर्यंत वेळ लागेल. नासुप्र व महाजेनको ने सी-प्लेन चा प्रकल्प तयार करून महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड, मुंबई ला पाठविला आहे. बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्या नेतृत्वात प्रकल्पाचा अभ्यास करून विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. १५ जुलै २०१६ रोजी आयोजित बैठकीत या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता अंतर (वायब्लिटी गॅप) वर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात आला होता. डिसेंबर २०१६ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली.