शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाला ‘एनटीओआरसी’ची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:31 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी, दानदात्यांअभावी अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेल्या रुग्णांना जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देमंजुरी मिळूनही दाते वंचित : कशी मिळणार अवयवदानाच्या चळवळीला गती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी, दानदात्यांअभावी अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेल्या रुग्णांना जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयवदान करून एक ब्रेन डेड (मेंदू मृत) व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकते. नागपूरच्या मेयो व मेडिकलचा विचार केल्यास दर दिवशी एकतरी ‘ब्रेन डेड’ व्यक्तीची नोंद होते. परंतु ‘एनटीओआरसी’ची मंजुरी नसल्याने अशा दात्याकडून अवयव काढता येत नव्हते. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१६पासून मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाल्याने या केंद्राची गरजही भासू लागली होती. याची दखल घेत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘एनटीओआरसी’चा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविला. या विभागाने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली. या शस्त्रक्रियेसाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये अद्यावत शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले. यामुळे मंजुरीच्या आठवडाभरात मेंदू मृतदात्याकडून अवयव घेण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु दोन महिन्याचा कालावधी होत असतानाही एकाही ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदान हाऊ शकले नाही.चार वर्षात २८ ब्रेनडेड दात्यांची नोंद‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायद्यानुसार प्रत्येक ‘ब्रेन डेड’ व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक आहे. असे असताना २०१३ ते आतापर्यंत केवळ २८ ‘ब्रेन डेड’ दात्याचेच अवयव प्रत्यारोपण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे, यात मेडिकलमधील केवळ एका रुग्णांची नोंद आहे. ‘ट्रॉमा’मधील अद्यावत शस्त्रक्रियागृहही सज्जअपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी मेडिकलमध्ये ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्यात आले. अपघातातील रुग्णांमध्ये मेंदू मृत व्यक्तीची संख्या मोठी असते. यामुळे ‘ट्रॉमा’मध्येच मेंदू मृत दात्याकडून अवयव काढण्यासाठी अद्यावत शस्त्रक्रियागृह सज्ज करण्यात आले. मेंदू मृत दात्यांसाठी लागणारे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची घोषणाही जिल्हाधिकाºयांनी केली आहे. परंतु या प्रक्रियेला सुरुवातच झाले नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयOrgan donationअवयव दान