शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वेटिंग कधीच संपेना!

By admin | Updated: May 9, 2014 20:07 IST

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्यामुळे पालकांनी आधीच प्रवासाची 'प्लॅनिंग' केली. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या आणि नागपूरमार्गे जाणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात मे महिन्यात वेटिंगची स्थिती.....

नागपूर : मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्यामुळे पालकांनी आधीच प्रवासाची ‘प्लॅनिंग’ केली. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या आणि नागपूरमार्गे जाणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात मे महिन्यात वेटिंगची स्थिती पाहावयास मिळत आहे.उन्हाळ्याच्या सुट्यात मुलांना पर्यटन, नातेवाईकांकडे जायला आवडते. त्यासाठी पालक आधीच तिकिटांचे आरक्षण करतात. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात संपूर्ण मे महिनाभर वेटिंगची स्थिती आहे.

मुंबईकडील गाड्यात विदर्भ एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट क्लास ३ जूनपर्यंत, एसी सेकंड १७ जूनपर्यंत, एसी थर्ड २३ जूनपर्यंत आणि स्लीपर क्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. दुरांतो एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट १९ मेपर्यंत, एसी सेकंड २७ मेपर्यंत, एसी थर्ड २८ मेपर्यंत आणि स्लीपरक्लास २९ मेपर्यंत हाऊसफुल्ल आहे. सेवाग्रामचा एसी फर्स्ट ३ जूनपर्यंत, एसी सेकंड ४ जूनपर्यंत आणि स्लीपरक्लास २९ मेपर्यंत वेटिंग आहे. पुण्याकडील गाड्यात नागपूर-पूणे एक्स्प्रेसमध्ये एसी फर्स्ट, सेकंड आणि स्लीपरक्लास १६ जूनपर्यंत फूल्ल आहे. नागपूर-पुणे गरीबरथही १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्येही १६ मेपर्यंत वेटिंग आहे. नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सर्व कोच १० जूनपर्यंत फुल्ल आहेत. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसही जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. नागपूर-इंदूर एक्स्प्रेसमध्येही तीच स्थिती आहे. दिल्ली मार्गावर जीटी एक्स्प्रेसमध्ये जुलै महिन्यापर्यंत ‘नो रूम’, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्येही ‘नॉट अ‍ॅव्हेलेबल’ची सूचना मिळत आहे. दक्षिण एक्स्प्रेसही २७ जूनपर्यंत फुल्ल आहे.

चेन्नईकडील गाड्यात तामिळनाडू एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंग, ग्रॅण्ड ट्रंक एक्स्प्रेस २४ जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. जयपूर-मद्रास एक्स्प्रेसही २६ मेपर्यंत वेटिंग आहे. बंगळुरूकडील गाड्यात निजामुद्दीन-बंगळुरू राजधानी ३० जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस २६ जूनपर्यंत फुल्ल आहे. संघमित्रा एक्स्प्रेसमध्येही २३ जूनपर्यंत वेटिंग आहे. हैदराबादकडे जाणार्‍या गाड्यात आंध्र प्रदेश एक्स्प्रेस २७ मेपर्यंत वेटिंग आहे. दक्षिण एक्स्प्रेसमध्येही २६ जूनपर्यंत वेटिंग आहे. पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेसही १३ जूनपर्यंत फुल्ल आहे. हावडाकडील गाड्यात गीतांजली एक्स्प्रेसमध्ये नॉट अ‍ॅव्हेलेबलची स्थिती असून, आझादहिंद एक्स्प्रेसही २९ जूनपर्यंत फुल्ल आहे.

एलटीटी-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसही २४ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. जयपूरकडे जाणार्‍या गाड्यात जयपूर एक्स्प्रेस जुलै महिन्यापर्यंत, नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. एकंदरीत सर्वच दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यात मे महिनाभर वेटिंग आहे. (प्रतिनिधी)