शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

भाजप संघटनेतील विविध कार्यकारिणींच्या घोषणेची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:07 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. मात्र ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. मात्र महिला मोर्चासह चार ते पाच महत्त्वाच्या मोर्चांची कार्यकारिणी अद्याप घोषित झालेली नाही. निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे अनेकांनी नगरसेवकपदासाठी फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे कार्यकारिणीवर नियुक्ती व्हावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. परंतु घोषणेला इतका विलंब का लावण्यात येत आहे, असा प्रश्न भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून उपस्थित करण्यात येत आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपच्या नागपूर महानगरातील शहर कार्यकारिणी, विविध आघाड्या, मोर्चा व सेलच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. परंतु कार्यकारिणींची घोषणा व्हायची होती. कोरोनाच्या कालावधीत काही मोर्चांच्या कार्यकारिणीची घोषणा झाली. परंतु भाजप महिला मोर्चा, भाजयुमो, अनुसूचित जाती मोर्चा, झोपडपटटी, व्यापारी मोर्चा यांच्यासह सेल व मोर्चांच्या कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही. अनेक कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. भाजयुमोसह विविध कार्यकारिणींसाठी नावेदेखील निश्चित करण्यात आली आहेत. मात्र तरीदेखील त्याची अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही. सोशल मीडियावरच नावे फिरत आहेत, मात्र पक्षाने अधिकृत नावे जाहीर न केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील संभ्रम आहे. भाजयुमोच्या काही सदस्यांची नावे अशीच समोर आली. मात्र काही नावांवरून कार्यकर्त्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. महिला मोर्चा, भाजयुमोचे कार्यकर्ते निवडणूकीच्या प्रचारासाठी महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे पक्षाने कार्यकारिणी घोषणेसाठी वेट अ‍ॅन्ड वॉचची भूमिका घेतली असल्याची माहिती पक्षातीलच वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांना संपर्क केला असता लवकरच सर्व कार्यकारिणी पक्षाकडून घोषित होतील. पक्षाच्या प्रक्रियेनुसारच काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंग साधण्याचे नियोजन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणूकीतील धक्क्यानंतर भाजपने कमकुवत भागांवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. नगरसेवक पदाचे तिकीट मोजक्याच लोकांना दिल्या जाऊ शकते. परंतु विविध मोर्चांच्या कार्यकारिणीत सर्वच घटकातील प्रतिनिधींना स्थान देऊन सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. नागपूर मनपा निवडणुकांच्या प्रचाराचे नियोजन डोळ्यासमोर ठेवूनच कार्यकारिणीतील नावे अंतिम करण्यात येत आहेत. स्थान न मिळालेले कार्यकर्ते नाराज होऊ नयेत याचे पक्षासमोर आव्हान राहणार आहे.

.