शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पंतप्रधानांच्या दौऱ्याची प्रशासनाला प्रतीक्षा

By admin | Updated: August 9, 2014 02:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ आॅगस्टला नागपुरात येणार असल्याची सर्वत्र चर्चा असली तरी...

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ आॅगस्टला नागपुरात येणार असल्याची सर्वत्र चर्चा असली तरी या दौऱ्यासंदर्भातील एनटीपीसीचे पत्र वगळता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अद्याप त्यांच्या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम आला नाही. एनटीपीसीच्या पत्रात पंतप्रधान २१ तारखेला मौदा येथील कार्यक्रमाला येऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी नागपूरला येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच पंतप्रधानांचा दौरा कसा असणार याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा केली जात आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एनटीपीसीचे पत्र वगळता अद्याप तरी अधिकृत दौरा आला नाही,असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणेला दौऱ्यापूर्वी काही दिवस आधी दिली जाते. हे येथे उल्लेखनीय.मोदी या दौऱ्यात नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करतील तसेच वर्धा जिल्ह्यातील देवळीतील पॉवरग्रीडचे उद््घाटन आणि तुळजापूर महामार्गाचे भूमिपूजन करतील, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात आले होते. देवळीच्या कार्यक्रमाबाबत वर्धेचे खासदार रामदास तडस यांनीही दुजोरा दिला होता. मात्र असे असले तरी अधिकृत दौऱ्याची माहिती जिल्हा प्रशासन, मेट्रो रेल्वेची नोडल एजन्सी नागपूर सुधार प्रन्यास आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेचा बंदोबस्त करणाऱ्या पोलीस यंत्रणेलाही प्राप्त नाही. (प्रतिनिधी)