शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्नपत्रिकेसाठी दोन तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:53 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत.

ठळक मुद्देतांत्रिक त्रुटींचा परीक्षार्थ्यांना फटका : महाविद्यालयांकडून ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ला दोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे २ वाजता सुरू होणारा ‘बीकॉम’चा पेपर दीड ते दोन तास उशिरा सुरू झाला. परीक्षा केंद्रांनी या विलंबाचा दोष विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ला दिला आहे.‘बीकॉम’च्या पहिला सत्राचा शनिवारी ‘फायनान्शियल अकाऊंटिंग’चा पेपर होता. दुपारी २ वाजता पेपर सुरू होणार होता. परीक्षा केंद्रांवर १.४५ च्या सुमारास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकादेखील वाटण्यात आल्या. मात्र काही परीक्षा केंद्रांवर २ वाजल्यानंतरदेखील प्रश्नपत्रिकांचा पत्ताच नव्हता. विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यानंतर प्रश्नपत्रिका येण्यास वेळ लागेल. तोपर्यंत बसून रहा, असे सांगण्यात आले. चक्क दीड ते दोन तासांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या. सायंकाळी ५ ला संपणारा पेपर काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालला. हिवाळ्याची सुरुवात असल्याने यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे पालकदेखील चिंतेत पडले होते व अनेक विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी अडचण झाली. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी ही बाब केंद्र अधिकाºयांना सांगितल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आल्या. यासंदर्भात महाविद्यालयांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. प्रश्नपत्रिकांच्या ‘आॅनलाईन डिलीव्हरी’त त्रुटी होत्या. त्यामुळे चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, असा दावा महाविद्यालयांतर्फे करण्यात आला. काही परीक्षा केंद्रावर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली असल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांनी मान्य केली. विलंबाची कारणे शोधण्यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.‘प्रिंटर’ झाले खराब‘पीडब्ल्यूएस’ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर तर भलत्याच कारणामुळे विलंब झाला. परीक्षा केंद्रावरील ‘प्रिंटर’ ऐनवेळी खराब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवर मिळाल्या नाहीत. हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकारदेखील येथे घडला.