ओबीसींची जनगणना करा
हिंगणा: ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी करीत काँग्रेसच्या वतीने हिंगण्यातील शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टनकर, जिल्हा काँग्रेस कमेटीचे अशोक पुनवटकर, विनोद उमरेडकर, संजय दलाल, शालिनी मनोहरे, नरेंद्र गुंजरकर आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
भिवापूर तालुका
भिवापूर येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर डडमल, सभापती ममता शेंडे, कृष्णा घोडेस्वार, चंद्रशेखर ढाकुनकर, दिलीप गुप्ता, किरण नागरिकर, भाऊराव तलमले, विजय वराडे, संतोष देवाळकर, पुरूषोत्तम फाये, जयंत उमरेडकर, कवडू नागरिकर, अमित आगलावे आदी उपस्थित होते.
नरखेड तालुका
नरखेड : मोवाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी चौकात तालुका अध्यक्ष सुदर्शन नवघरे याच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा ओबीसींच्या आरक्षणाला फटका बसल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. अनिल कोरडे, मोवाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर साठवणे, योगेंद्र बहादुरे, सुनील बालपांडे, शंकर फुले, दिगांबर बालपांडे, सुरेश राऊत, गुलाम अली आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
कुही तालुका
कुही : ओबीसींच्या जनगणनेची मागणी करीत कुही तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने कुही येथील बाजार चौैकात केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी कुही तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उपासराव भुते, बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे,उपसभापती बाजार समिती महादेव जिभकाटे, राहुल घरडे आदी उपस्थित होते.